रासपचे पन्नास आमदार निवडून द्या, मराठवाड्याचा कॅलिफोर्निया करतो..

रासप राष्ट्रीय पक्ष व्हावा यासाठी प्रयत्न सुरू आहे.
रासपचे पन्नास आमदार निवडून द्या, मराठवाड्याचा कॅलिफोर्निया करतो..
Rsp Leader Mahadev Jankar News Aurangabad

औरंगाबाद : राष्ट्रीय समाज पार्टी हा फुले, शाहू आणि आंबेडकरांना मानणारा पक्ष आहे. आमची लढाई ही हिंदुत्ववाद्यांसोबत आहे, असं सांगतानाच रासपचे ५० आमदार निवडून आल्यास मराठवाड्याचा कॅलिफोर्निया करू, अशी घोषणा रासपचे अध्यक्ष आणि माजी मंत्री महादेव जानकर यांनी केली. (Elect fifty MLAs of RSP, California does Marathwada) महादेव जानकर यानी सुभेदारी विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.

आम्ही औरंगाबाद महापालिका निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केलं आहे. त्यासाठी आम्ही पक्ष संघटना वाढवण्यावर भर देणार आहोत. औरंगाबाद महापालिकेच्या सर्व प्रभागात रासपचे उमेदवार उभे करण्यात येणार आहेत. ( Rsp Leader Mahadev jankar) रासप राष्ट्रीय पक्ष व्हावा यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही, त्यांनी सांगितले. राज्यातील दोनशे विधानसभा मतदारसंघात शंभर गाड्या घेऊन आपण रॅली काढणार असून कोकणातील शेतकऱ्यांसाठी आपण ब्लू प्रिंट बनवली असल्याचेही जानकर म्हणाले.

कोकणातील पाणी पाईपलाईनद्वारे मराठवाड्याला आणलं पाहिजे. गायीच्या दुधाला ५० रुपये आणि म्हशीच्या दुधाला ६० रुपये भाव मिळाला पाहिजे. पण काही झारीतले शुक्राचार्य हे होऊ देत नाही, असा आरोपही त्यांनी केला.  या देशात जनावरांची जनगणना होते, पण माणासांची होत नाही. काँग्रेसची सत्ता असताना मंडल आयोग लागू का झाला नाही? असा प्रश्न उपस्थित करतानाच ओबीसींची जनगणना झालीच पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

ओबीसींना न्याय द्या

एमपीएससीच्या बोर्डात ओबीसीचा एकही संचालक नाही. त्यामुळे ओबीसींनी जागं झालं पाहिजे. कुठपर्यंत भीक मागणार आहात? जो बंगला माझा नाही तिथे काय राहायचं हे ओबीसींनीच ठरवलं पाहिजे. ओबीसींसाठी हक्काची झोपडी बांधणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत: लक्ष देऊन ओबीसींना न्याय दिला पाहिजे, असेही जानकर म्हणाले.

Edited By : Jagdish Pansare

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in