औरंगाबादेत १० जुलैपासून आठ दिवसांचा जनता कर्फ्यू...

हा जनता कर्फ्यू असला तरी शासनाकडून याची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे. आतापर्यंत नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य केले आहे, जनता कर्फ्यूमध्ये देखील अधिक चांगल्या पध्दतीने ते सहकार्य करतील आणि कोरोनाची साखळी तोडून शहर व जिल्हा कोरोनामुक्त करण्यात महत्वाची भूमिका बजावतील, अशी अपेक्षाही जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
aurangabad lockdwoun agian news
aurangabad lockdwoun agian news

औरंगाबादः लोकप्रतिनिधी, प्रशासन, उद्योजक आणि व्यापाऱ्यांच्या संयुक्त बैठकीत येत्या १० जुलैपासून शहरात आठ दिवसांचा म्हणजेत १८ जुलैपर्यंत जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या काळात उद्योग देखील बंद ठेवण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी पत्रकारांशी बोलतांना स्पष्ट केले.

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील वगळता शहरातील सर्व लोकप्रतिनिधी बैठकीला हजर होते. शहराची परिस्थती पुर्वपदावर येत असतांना पुन्हा लॉकडाऊन करण्यात येऊ नये, अशी भूमिका इम्तियाज जलील यांनी घेतली होती. परंतु सर्वानुमते जनता कर्फ्यूचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

शहर व ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. बाधितांचा आकडा सात हजारांकडे वाटचाल करत असतांना मृतांची संख्या देखील तीनशेच्या घरात पोहचल्याने पुन्हा लॉकडाऊन करावा, अशी मागणी केली जात होती.

सध्या सायंकाळी ७ ते पहाटे ५ या वेळेत संपुर्ण संचारबंदीची अंमलबजावणी सरू आहे. पण यामुळे कोरोना संसर्गाची साखळी थांबणार नाही, पुर्णपणे लॉकडाऊनच हवा असा सूर आजच्या बैठकीत देखील निघाला. बैठकीनंतर जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी झालल्या निर्णयाची माहिती पत्रकारांना दिली.

उदय चौधरी म्हणाले, येत्या १० ते १८ जुलै दरम्यान, शहरात जनता कर्फ्यूचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे. वाळूज, बजाजनगर या औद्योगिक भागात गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढ होत आहे, या पार्श्वभूमीवर कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जनता कर्फ्यूमध्ये उद्योग देखील बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या शिवाय फळ, भाजीपाला आणि किराणा दुकाने देखील या दरम्यान बंद ठेवण्यात येणार आहेत. जनता कर्फ्यूला आणखी चार दिवसांचा अवधी असल्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता अत्यावश्यक वस्तू, भाजीपाला, फळे, किराणा सामान आणून ठेवावा, गर्दी करू नये. बंदच्या काळात कुणालाही अत्यावश्यक वस्तूची कमतरता भासू नये याची काळजी महापालिका आयुक्त घेतील असेही, चौधरी यांनी स्पप्ट केले. 

हा जनता कर्फ्यू असला तरी शासनाकडून याची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे. आतापर्यंत नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य केले आहे, जनता कर्फ्यूमध्ये देखील अधिक चांगल्या पध्दतीने ते सहकार्य करतील आणि कोरोनाची साखळी तोडून शहर व जिल्हा कोरोनामुक्त करण्यात महत्वाची भूमिका बजावतील, अशी अपेक्षाही जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com