खासदार, आमदारांच्या प्रयत्नाने शिवसेनेला जिल्हा बॅंकेत उपाध्यक्ष पद मिळाले..

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेच्या प्रत्येक निवडणुकीत आमदार सुरेश वरपुडकर व माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर या दोननेत्यांच्या भोवतीच राजकारण फिरत राहिले.
Parbhani District Bank News
Parbhani District Bank News

परभणी : गेल्या अनेक वर्षापासून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेच्या राजकारणात शिवसेनेला कधीही  यश मिळाले नव्हते. परंतू यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेकडे राजेश पाटील गोरेगावकर यांच्या रुपाने उपाध्यक्षपद आल्याने शिवसेनेत आनंदाचे वातावरण आहे. या निमित्ताने शिवसेनेचे सहकार क्षेत्रात पदार्पण झाल्याची चर्चा आहे. खासदार संजय जाधव, आमदार राहूल पाटील यांच्या प्रयत्नातून हे यश मिळाल्याचे बोलले जाते. 

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेच्या प्रत्येक निवडणुकीत आमदार सुरेश वरपुडकर व माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर या दोन नेत्यांच्या भोवतीच राजकारण फिरत राहिले आहे. कधी बोर्डीकरांनी वरपुडकरांना मात दिली तर कधी वरपुडकर बोर्डीकरांवर भारी पडले. असे असले तरी या दोघांच्या पलीकडे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेचे राजकारण कधी गेलेच नाही.

जिल्ह्यात सर्वाधिक ताकदवान पक्ष असलेल्या शिवसेनेने याआधी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेच्या राजकारणात सक्रीय सहभाग नोंदवला नव्हता. त्यामुळे शिवसेनेचे
संचालक जरी असले तरी तो संचालक कधी अध्यक्ष, उपाध्यक्ष पदावर पोहचलाच नाही. यावेळी ही तीच परिस्थिती निर्माण झाली होती.

सुरेश वरपुडकर यांच्या गटाचे १० तर माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या गटाचे ९ संचालक निवडून आले होते. त्यामुळे वरपुडकर गटाचा अध्यक्ष होणार हे निश्चित मानले जात होते. परंतू निकालाच्या दिवशीच आमदार बाबाजानी दुर्राणी यांना अध्यक्षपद खुनावू
लागले. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी कॉग्रेसचे चार संचालकांना कुणीही गृहित धरू नये अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यामुळे पेच निर्माण झाला होता.

आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या या प्रतिक्रियेवर वरपुडकर - बोर्डीकरांकडून कसली ही प्रतिक्रिया आली नसल्याने 'खेल कुछ औरही है..' हे सर्वांच्या ध्यानात आले. सुरेश वरपुडकर हेच अध्यक्षपदासाठी इच्छुक असल्याचे समोर आल्याने त्यावर शिक्कामोर्तबच झाले.  त्यानुसार वरपुडकर हे अध्यक्षपदावर विराजमान झाले. तर यावेळी सक्रीय झालेल्या शिवसेना खासदार जाधव व आमदार पाटील या जोडीच्या आठवडाभरापासूनच्या प्रयत्न आणि घडामोडीने उपाध्यक्षपद शिवसेनेकडे आले.

हिंगोलीचे राजेश पाटील गोरेगावकर यांच्या रुपाने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेचे
उपाध्यक्षपद शिवसेनेला मिळाले. या निमित्ताने जिल्हा बॅंकेत महाविकास आघाडी अबाधित राहिल्याचे देखील दिसून आले.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com