शिक्षणतज्ञ फातेमा झकेरिया यांचे निधन - Education expert Fatima Zakaria passes away | Politics Marathi News - Sarkarnama

शिक्षणतज्ञ फातेमा झकेरिया यांचे निधन

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 6 एप्रिल 2021

त्यांनी दी टाईम्स ऑफ इंडीया मध्ये दहा वर्ष लिखान केले.  इंदिरा गांधी, मार्गारेट थॅचर, जे. आर. डी., टाटा, जयप्रकाशन नारारायण, पंतप्रधान मोरारजी देसाई, चरण सिंग यांच्या मुलाखती देखील त्यांनी घेतल्या होत्या.

औरंगाबाद : मौलाना आझाद एज्युकेशनल ट्रस्ट आणि मौलाना आझाद सोसायटीच्या अध्यक्षा फातेमा रफीक झकेरिया यांचे मंगळवारी (ता.६) खासगी रुग्णालयात निधन झाले. फातेमा झकेरिया यांनी ५० वर्षा पेक्षा जास्त काळ पत्रकारिता, सामाजिक व शिक्षण क्षेत्रात महत्वाचे योगदान दिले. माजी मंत्री, खासदार तथा औरंगाबादचे जनक, शिक्षण क्षेत्रातील नामांकित डाॅ. रफिक झकेरिया यांच्या त्या पत्नी होत्या.

फातेमा झकेरिया यांना सन २००६ मध्ये शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट काम केल्याबद्दल पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. फातेमा झकेरिया यांचा जन्म मुंबईत येथे १७ फेब्रुवारी १९३६ रोजी झाला. फातेमा झकेरिया यांनी आयटी कॉलेज लखनऊ तसेच इन्स्टीट्युट ऑफ सोशल वर्क मुंबई येथुन शिक्षण घेतले. १९५८ मध्ये त्यांनी इन्स्टीट्युट ऑफ चिल्ड्रन ॲण्ड वुमेन्स इंडस्ट्रीयल होमद्वारे ५०० पेक्षा जास्त मुलांची देखलभाल त्यांच्या शिक्षण, आरोग्याची जबाबदारी घेतली होती.

फातेमा झकेरिया यांनी १९६३ मध्ये द इलस्ट्रेटेड या साप्ताहिकात लहान मुलांसाठी लेखन सुरु केले. या मध्ये नियमित साप्ताहिक कॉलम चालविण्या व्यतिरिक्त त्यांनी डॉ. जाकिर हुसैन, कृष्ण चंदर अशा अनेक लेखांच्या लघुकथांचे उर्दुतून इंग्रजीत भाषांतर केले.  १९७० ते १९८० या दरम्यान त्यांनी ‘दी वीकली’ साप्ताहिकात उपसंपादक, मुख्य उपसंपादक तसेच सहाय्यक संपादक म्हणून काम केले.

यानंतर त्यांनी दी टाईम्स ऑफ इंडीया, दी वीकली मध्ये राजकीय, सांस्कृतिक विषयांवर लिखाण केले. त्यांनी दी टाईम्स ऑफ इंडीया मध्ये दहा वर्ष लिखान केले.  इंदिरा गांधी, मार्गारेट थॅचर, जे. आर. डी., टाटा, जयप्रकाशन नारारायण, पंतप्रधान मोरारजी देसाई, चरण सिंग यांच्या मुलाखती देखील त्यांनी घेतल्या होत्या.

१९८४ मध्ये अमेरिकेत झालेल्या निवडणुका तसेच फेस्टीव्हल ऑफ इंडीया इन लंडन ॲण्ड दी युनायटेड स्टेटचे वृत्तांकन केले होते. फेस्टीव्हल ऑफ इस्लाम इन लंडन येथे त्यांनी १९७६ मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. केंद्र सरकारच्या मिडीया पुनर्रचना समितीच्याही त्या सदस्य होत्या.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख