कोरोना काळात, रुग्ण व नातेवाईकांसाठी खासदार जाधवांनी उभी केली शिवसैनिकांची फौज - During the Corona period, MP Jadhav raised an army of Shiv Sainiks for the sick and their relatives | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

इंदापूरला उजनीतून पाणी देण्याचा निर्णय रद्द : जयंत पाटील यांची घोषणा
मंत्रीमंडळाच्या उपसमितीच्या बैठकीसाठी महाविकास आघाडीतील प्रमुख नेते सह्याद्रीवर दाखल. एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आणि मुख्य सचिव सिताराम कुंटे हेही उपस्थित आहेत.
मराठा आरक्षणासाठीची भाजपची महत्वाची बैठक आज विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी होत आहे. यासाठी रविंद्र चव्हाण, चंद्रकांत पाटील, गिरीश बापट, प्रवीण दरेकर उपस्थित आहेत.

कोरोना काळात, रुग्ण व नातेवाईकांसाठी खासदार जाधवांनी उभी केली शिवसैनिकांची फौज

गणेश पांडे
शुक्रवार, 16 एप्रिल 2021

कोविड सेंटरमधील रुग्णांना तातडीची मदत मिळावी, यासाठी शिवसैनिकाची फौजच तयार करण्यात आली आहे.

परभणी ः कोरोना संकर्मणामुळे संपूर्ण जिल्ह्यात भितीचे वातावरण आहे. आपत्तीच्या या काळात ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना योग्य सल्ला व मदत मिळावी, यासाठी शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी शिवसेना मदत केंद्र सुरू केले आहे. या मदत केंद्राच्या माध्यमातून गरजू लोकांना तत्पर सेवा दिली जाणार आहे.

कोरोनाबाधित रुग्णांसह कुटूंबियांना या आपत्ती काळात अ‍ॅडमीटसह तपासणी, औषधोपचार, तसेच भोजनासह अन्य अडीअडचणीत मदत करता यावी, यासाठी हे केंद्र व शिवसैनिक काम करणार आहेत. वसमत रस्त्यावरील खासदार संजय जाधव   यांच्या संपर्क कार्यालयात हे मदत केंद्र सुरु करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे शहरातील वेगवेगळ्या कोविड सेंटरमधील रुग्णांना तातडीची मदत मिळावी, यासाठी शिवसैनिकाची फौजच तयार करण्यात आली आहे. या शिवसैनिकांचे मोबाईल नंबर देखील संजय जाधव यांनी जाहिर केले आहेत.

अशी आहेत कार्यकर्त्यांची नावे व क्रमांक

जिल्हा शासकीय रुग्णालय, बबनराव मुळे 9767106363, करीम हॉस्पीटल, महेश येरळकर 9096933359, संतोष कांबळे, 7972113309, सचिन मोटे 9823147550, जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीतील कोविड सेंटर,शेख शब्बीरभाई 9923153242, पाडेला हॉस्पीटल, बॉबी सूर्यवंशी, 9096499971,, अमोल कुलथे, 9890849949, गजानन दमकोंडे, 9403062020, सतीश नारवाणी, 9422111110, नावंदर हॉस्पिटल, अतुल सरोदे 9422104777, अबोली हॉस्पीटल,अंगद अंभुरे 9518950902, स्वाती क्रिटिकल ःरामप्रसाद रणेर, 9527437777, अक्षदा मंगल कार्यालय,प्रदीप भालेराव, 9011192224, अंभोरे हॉस्पिटल,व्यंकटेश वाघ, 9423444692, संदीप देशमुख 9970634063, संजय सारणीकर, 9767100358, उमेश वाघमारे, चिरायू हॉस्पिटल,गंगाप्रसाद आणेराव, 9921747777, लाईफ लाईन हॉस्पिटल, भगवानराव धस 9923179797, लोटस हॉस्पिटल, विजयसिंह ठाकूर 9823135404, परभणी आयसीयू, विलास अवकाळे, 9764332111, अनन्या हॉस्पिटल, गुणाजी अवकाळे, 8208296404, सिध्दीविनायक हॉस्पिटल,प्रल्हाद
चव्हाण,  9673806015
, सूर्या हॉस्पिटल, संजय सारणीकर, 9921808052,धानोरकर हॉस्पिटल, विठ्ठल पंढरे, 9527454549 व हयात हॉस्पिटल, भास्कर हेगडे,9766464211, सुभाष आहेर 9511237291, आकाश पांचाळ,7020597300, पिराजी नरवाडे 70201958057, अमोल भिसे, 9021132813

शिवसेना सर्वेत्तपरी मदतीला तत्पर

या मदत केंद्राव्दारे शहरी व ग्रामीण भागातील कोरोनाबाधित रुग्णांना त्यांच्या कुटूंबियांना योग्य ते मार्गदर्शन मिळेलच,  त्यापाठोपाठ त्यांच्या अडीअडचणी व अऩ्य समस्यासुध्दा
सुटतील. सरकारी व खासगी रुग्णालयांमधुन शिवसेनेचे कार्यकर्ते मदतीसाठी तैनात असणार आहेत. संबंधितांनी या कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा, सर्वतोपरी मदतीचा हात निश्रि्चत मिळेल, असे आवाहन खासदार संजय जाधव यांनी केले आहे.

Edited By : Jagdish Pansare
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख