आमदार निलंगेकरांच्या दबावामुळेच माझ्यासह काॅंग्रेस कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

भाजपच्या कार्यकर्त्यांकडून राज्य शासनाच्या विरोधात अनेक आंदोलने केली गेली आहेत. त्यांच्यावरगुन्हे कादाखल झाले नाहीत.
Congress Leader Ashok Nilangekar- Bjp Mla Sambhaji Nilangekar News Latur
Congress Leader Ashok Nilangekar- Bjp Mla Sambhaji Nilangekar News Latur

निलंगा : केंद्रांने पारीत केलेल्या तीन कृषी कायद्याविरोधात दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी निलंग्यात काँग्रेसने धरणे आंदोलन केले. याप्रकरणी २६ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. भाजपाकडूनही पूर्वी राज्य सरकारच्या विरोधात आंदोलने केली गेली, मात्र त्यांच्यावर गुन्हे का? दाखल केले जात नाहीत, असा सवाल काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोक पाटील निलंगेकर यांनी केला.

रविवारी पत्रकार परिषद घेऊन अशोक निलंगेकर यांनी भाजपचे माजी मंत्री, विद्यमान आमदार व पुतणे संभाजी पाटील निलंगेकर यांच्याकडे उंगली निर्देश करत त्यांच्या दबावामुळेच काॅंग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाल्याचा आरोप केला. निलंगेकर म्हणाले,  १२० दिवसापासून केंद्रशासनाच्या कृषी कायद्याविरोधात शेतकरी आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला समर्थन करण्यासाठी राज्यभर काँग्रेसने धरणे आंदोलन पुकारले होते.

निलंगा येथे उपविभागीय कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाबाबतीत काँग्रेसच्या पदाधिका-यांनी तालुका प्रशासनाला माहिती देऊनही प्रशासनाकडून जिल्ह्यात जमाबंदी आदेश असताना आंदोलन करू नका म्हणून कोणतीही लेखी अथवा तोंडी कळवले नाही. कोरोना संसर्गाचे संपूर्ण नियम पाळून आम्ही शुक्रवारी २६ रोजी आंदोलन केले.  मात्र माझ्यासह अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांवर जमाबंदी आदेशाचे उलंघन केले म्हणून गुन्हे दाखल केले आहेत.

भाजपच्या कार्यकर्त्यांकडून राज्य शासनाच्या विरोधात अनेक आंदोलने केली गेली आहेत. त्यांच्यावर गुन्हे का दाखल झाले नाहीत, जनतेच्या हितासाठी असे अनेक गुन्हे दाखल झाले तरी आम्ही माघार घेणार नाही. राज्यातील विरोधी पक्ष हा लोकांच्या हितासाठी काम करत नसून सत्तेत बसण्यासाठी बिनबुडाचे आरोप करून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका देखील अशोक निलंगेकर यांनी केली.

नगरपालिकेतील कामाची श्वेतपत्रिका काढा

माजी मुख्यमंत्री डॉ शिवाजीराव पाटील निलंगेकर यानी पाणी पुरवठ्याची ८५ किलोमीटरची योजना निलंगा शहरासाठी कार्यन्वीत केली. मात्र नगरपालिकेतील सत्ताधा-याना 'आयते वाढून ठेवलेले ताट' निट खाता येईना मुबलक पाणी व यंत्रणा असतानाही त्यांच्याकडून वेळेवर पाणी दिले जात नाही ,असा आरोपही त्यांनी केला.

पाणीपुरवठा योजनेच्या नावाखाली शहरातील अंतर्गत रस्ते खराब झाले आहेत. शहर पंधरा दिवसापासून आंधारात आहे. शहरात गेल्या २३ दिवसापासून नळाला पाणी आले नाही. मीटर बसवून पैसे काढले जात आहेत. ते कोणत्या निकषावर घेतले जातात याचा हिशोब नगरपालीकेने द्यावा, तसेच केलेल्या कामाची श्वेतपञिका काढावी अशी मागणी  निलंगेकर यानी केली.

मीटरच्या नावाखाली घेतलेल्या पैशातूनच शहरातील विजबिलभरणा करावा अशी मागणी करून शहराच्या विकासासाठी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असले तरी सत्ताधारी नगरपालिकेतील पदाधिका-यानी आमच्याकडे शहराच्या विकासासाठी निधीची गरज आहे म्हणून कधीही मागणी केली नाही. आम्ही तुमच्या सोबत राहून विकासनिधी खेचून आणू असे आवाहनही त्यांनी विरोधकांना केले.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com