माझ्या प्रेमापोटी महिनाभरात दिल्लीत दहा हजार कार्यकर्ते भेटायला आले ..

संबधित खात्याचा अभ्यास करा आणि खात्याची माहिती घेऊनच मतदार संघात जा, असे आदेश दिले होते.
Minister Raovsaheb danve -Haribhau Bagde News Aurangabad
Minister Raovsaheb danve -Haribhau Bagde News Aurangabad

फुलंब्री : मोदी सरकारने नव्याने रेल्वे खात्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे. त्यानंतर सर्वच मंत्र्यांना एक महिना दिल्ली न सोडण्याचे आदेश दिले होते. या एका महिन्यामध्ये सर्व मंत्र्यांनी आपापल्या विभागाची, खात्याची संपूर्ण माहिती घेऊन मतदारसंघात जावे असे, सांगण्यात आले होते. (Modi's order was to study the account first, then go to the constituency.) या काळात दिल्लीत मला भेटायला दहा हजार कार्यकर्ते आले होते, असे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितले.

मोदींच्या मंत्रीमंडळ विस्तारात रावसाहेब दानवेे यांना रेल्वे, कोळसा व खाण विभागाचे राज्यमंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली. मराठवाड्याला पहिल्यांदाच रेल्वे खात्याचे राज्यमंत्रीपद मिळाल्यानंतर महिनाभराने दानवे यांचे आज औरंगाबादेत रेल्वेने आगमन झाले. ( Central State Railway Minister Raosaheb Danve) देवगिरी एक्सप्रेसने रेल्वेस्थानकात आगमन झाल्यानंतर त्यांचे ढोल-ताशांच्या गजरात, क्रेनने भला मोठा हार घालून भाजपच्या वतीने स्वागत करण्यात आले. 

त्यानंतर भाजपचे फुलंब्रीचे आमदार हरिभाऊ बागडे यांचा वाढदिवस व रावसाहेब दानवे यांना मंत्रीपद मिळाल्याबद्दल सत्काराचे आयोजन फुलंब्री करण्यात आले होते. (Bjp Mla Haribhau Bagde) कोरोना काळात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या अंगणवाडी सेविका व आशा सेविकांचा सत्कार देखील या वेळी या दोन नेत्यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी रावसाहेब दानवे यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत भाषण करत दिल्लीतील एक महिन्याच्या कामाविषयी सांगितले. यावेळी आमदार हरिभाऊ बागडे, महिला व बालकल्याण सभापती अनुराधा चव्हाण, भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय औताडे, भाजपचे तालुकाध्यक्ष सुहास शिरसाट आदींची उपस्थिती होती.

आधी खाते समजून घ्या..

कार्यकर्त्यांना एकत्र आणण्यासाठी वाढदिवस व अभिष्टचिंतन साजरा करण्याचे केवळ निमित्त असते. मोदीं साहेबांनी एक महिना दिल्ली सोडून जायचे नाही , संबधित खात्याचा अभ्यास करा आणि खात्याची माहिती घेऊनच मतदार संघात जा, असे आदेश दिले होते. त्यामुळे एक महिना दहा दिवस दिल्लीत थांबलो.

तेव्हा मतदार संघातील तब्बल १० हजार दोनशे कार्यकर्ते मला भेटण्यासाठी दिल्लीत आले होते. एकमेकांच्या प्रेमापोटी कार्यकर्ते मला दिल्लीत भेटायला यायचे याचा मला सार्थ अभिमान वाटत असल्याचे दानवे म्हणाले.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com