लातूरच्या चिखली गावातील डाॅ.कराड मंत्री झाले, गावकऱ्यांनी साजरी केली दिवाळी.. - Dr. Karad from Chikhali village of Latur became a minister, villagers celebrated Diwali. | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

लातूरच्या चिखली गावातील डाॅ.कराड मंत्री झाले, गावकऱ्यांनी साजरी केली दिवाळी..

दिपक क्षीरसागर
बुधवार, 7 जुलै 2021

कराड यांचे प्राथमिक शिक्षण याच चिखली गावात झाले होते. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या खांद्याला खांदा लावून कराड यांनी काम केले.

लातूर ः अहमदपूर तालुक्यातील चिखली गावचे मुळ रहिवाशी असलेले भाजपचे राज्यसभेतील खासदार डाॅ. भागवत कराड यांनी आज केंद्रीय राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली. कराड दिल्लीत मंत्रीपदाची शपथ घेत असतांना इकडे त्यांच्या मुळगावी हलगी, बॅन्ड वाजवत, फटाके फोडून आणि गुलालाची उधळण करत जल्लोष करण्यात आला. (Dr. Karad from Chikhali village of Latur became a minister, villagers celebrated Diwali.) चिखली ग्रामस्थांना कराड यांच्यामुळे वर्षभरात दुसऱ्यांदा जल्लोष करण्याची संधी मिळाली.

गेल्या वर्षी कराड यांची राज्यसभेवर निवड झाली तेव्हा देखील गावात असाच जल्लोष करण्यात आला होता. केंद्रीय मंत्रीमंडळ विस्तारात डाॅ.कराड यांना संधी मिळणार असल्याची चर्चा दोन दिवसांपासून गावांत देखील होती. (Bjp Leader Central State Minister Dr. Bhagwat Karad) त्यामुळे सगळ्यांच्या नजरा दिल्लीकडे लागल्या होत्या. आज  मंत्रिमंडळ विस्तार होऊन त्यात कराड यांनी राज्यमंत्री पदाची शपथ घेतली. तेव्हा लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील चिखली या त्यांच्या मुळगावी आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

नातेवाईक, ग्रामस्थ, युवकांनी हालगी, ढोल ताशा वाजवत जल्लोष केला, तर गावात ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी देखील करण्यात आली.  कराडांना मंत्रीपद मिळाल्याचा आनंद गावकऱ्यांचा चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता. अनेकांनी टीव्हीवर हा शपथविधी सोहळा पाहिला. यावेळी कराड यांचे मित्र व नातेवाईकांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले होते.

कराड यांचे प्राथमिक शिक्षण याच चिखली गावात झाले होते. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या खांद्याला खांदा लावून कराड यांनी काम केले. संकट असो वा अडचणीचा काळ ते खंबीरपणे मुंडे यांच्या सोबत एकनिष्ठ राहिल्याचे त्यांच्या अनेक मित्रांनी सांगत गोपीनाथ मुंडे यांची देखील या निमित्ताने आठवण काढली. कराड यांना मंत्रीपद मिळने हा बहुमान गावाचा नसून महाराष्ट्राचा असल्याच्या भावना देखील गावकऱ्यांनी व्यक्त केल्या.  

गावात आज अक्षरशः दिवाळी साजरी झाली. डाॅ.भागवत कराड तुम आगे बढो अशा घोषणा देतांना गावकऱ्यांनी गोपीनाथ मुंडे अमर रहे, असे म्हणत त्यांचीही आठवण या निमित्ताने काढली.

हे ही वाचा ः भागवत कराडांचे नशीब फळफळले, वर्षभरातच खासदारकी आणि मंत्रीपदही..

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख