डाॅ. भागवत कराडांचे नशीब फळफळले, वर्षभरातच खासदारकी आणि मंत्रीपदही..

१९९५ ते २०१० या १५ वर्षाच्या काळात औरंगाबाद महापालिकेत ते तीनवेळा नगरसेवक म्हणून निवडून आले. याकाळात औरंगाबाद शहराचे दोन वेळा महापौरपदही त्यांनी भूषवले.
Bjp Mp. Dr. Bhagwat Karad News Aurangabad
Bjp Mp. Dr. Bhagwat Karad News Aurangabad

औरंगाबाद : भाजपचे राज्यसभेतील खासदार डाॅ. भागवत कराड यांचे नशिब पुन्हा एकदा फळफळले आहे. गेल्याच वर्षी अचानक राज्यसभेवर खासदार म्हणून नियुक्ती झाल्यानंतर आता वर्षभरातच कराड यांची केंद्रीय मंत्रीमंडळात वर्णी लागली आहे. कराड यांच्या रुपाने जिल्ह्याला पहिल्यांदाच मंत्रीपद मिळाले आहे. (Dr. Bhagwat Karad's fortunes paid off, as well as MP and ministerial posts throughout the year.) डाॅ. भागवत कराड यांचा मंत्रीमंडळात समावेश झाल्याने दिल्लीतील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची मुंडे भगिनींवर अजूनही नाराजी कायम असल्याची चर्चा देखील या निमित्ताने होत आहे.

बीडच्या खासदार डाॅ. प्रितम मुंडे यांना मंत्रीमंडळात संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती, मात्र कराड यांनी त्यांच्यावर मात करत बाजी मारल्याचे दिसते. (Bjp Rajyasbha Mp Dr. Bhagwat karad) डाॅ. भागवत यांचा मंत्रीमंडळातील समावेश पुन्हा एकदा आश्चर्याचा धक्का समजला जात असला तरी त्यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून पक्ष कार्य करत असलेल्या डाॅ. कराड यांची गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली होती. परंतु कोरोना संकटामुळे त्यांनी २२ जुलै रोजी सदस्यत्वाची शपथ घेतली होती. भाजपच्या कोट्यातून महाराष्ट्रातून डॉ. भागवत कराड यांच्यासह  रामदास आठवले आणि छत्रपती उदयनराजे भोसले यांनी खासदारपदाची शपथ घेतली होती. राज्यसभेच्या ५७ जागांसाठी मार्च महिन्यात निवडणूक प्रकिया पार पडली  तेव्हा  महाराष्ट्रातून १८ मार्च रोजी सात जागाची बिनविरोध निवड झाली होती.

डॉ. भागवत कराड यांच्या रुपाने औरंगाबाद शहराला राज्यसभेतील खासदारपद मिळाले. मोदी मंत्रीमंडळ विस्ताराची चर्चा काही दिवसांपासून सुरू होती. कराड यांच्या नावाची चर्चा सुरू झाल्यानंतर काल ते मुंबई आणि आज सकाळीच दिल्लीला कुटुंबियांसह पोहचले. आतापर्यंत केंद्रात मराठवाड्याला अनेकदा मंत्रीपदाची संधी मिळाली. विलासराव देशमुख, जयसिंगराव गायकवाड, गोपीनाथ मुंडे यांनी केंद्रात मंत्रीपद भुषवले. पण औंरगाबाद जिल्ह्याला पहिल्यादांच केंद्रात मंत्रीपद मिळाले आहे.

भागवत कराड यांची राजकीय वाटचाल

व्यवसायाने  डाॅक्टर असलेले भागवत कराड बालरोग शल्यचिकित्सक आहेत. औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महविद्यालयातून त्यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले आहे.  वैद्यकीय पेशा असलेले कराड १९९५ मध्ये राजकारणात आले.  त्यांनी अपक्ष म्हणून महापालिकेची निवडणूक लढवली आणि ते निवडून देखील आले. त्यानंतर गोपीनाथ मुंडे यांनी कराड यांना राजकारणात अधिक बळ देत औरंगाबाद महापालिकेत दोनवेळा महापौर होण्याची संधी दिली.

महापौर राहिलेल्या कराड यांना २००९ च्या विधानसभा निवडणूकीत औरंगाबाद पुर्व मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती, परंतु त्यांच्या पराभव झाला.  राज्यात फडणवीस सरकार असतांना प्रदेश उपाध्यक्ष असलेल्या कराड यांना मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्षपद देखील देण्यात आले होते. त्यानंतर गेल्या वर्षी राज्यसभेवर डाॅ. कराड यांची अनपेक्षितपणे वर्णी लागली.

खासदार होऊन वर्ष उलटत नाही तोच जातीय समीकरण आणि समतोल साधण्याच्या दिल्लीतल वरिष्ठ नेत्यांच्या धोरणामुळे पुन्हा एकदा कराड यांचे नशिब फळफळले आणि त्यांना केंद्रात मंत्रीपदही मिळाले. १६ जुलै १९५६  रोजी लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातल्या चिखली गावात त्यांचा जन्म झाला.

१९९५ ते २०१० या १५ वर्षाच्या काळात औरंगाबाद महापालिकेत ते तीनवेळा नगरसेवक म्हणून निवडून आले.  याकाळात औरंगाबाद शहराचे दोन वेळा महापौरपदही त्यांनी भूषवले. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे व पंकजा मुंडे यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे. 

Edited By : Jagdish Pansare
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com