डॉ. भागवत कराड चार महिन्यांनी घेणार खासदार पदाची शपथ 

भाजपने चर्चेत नसलेल्या डाॅ. भागवत कराड यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला, याचे सगळ्यांनाच आश्चर्य वाटले होते. परंतु महाराष्ट्रातील राजकीय परिस्थीती माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी पक्षापासून राखलेले अंतर पाहता राज्याच्या राजकारणात निर्णयाक भूमिका बजावणाऱ्या वंजारी समाजाला प्रतिनिधित्व देत भाजपच्या राज्य व केंद्रातील नेतृत्वाने सोशल इंजिनिअरिंग साधल्याची जोरदार चर्चा त्यावेळी होती.
after four month dr. karad take othe news
after four month dr. karad take othe news

औरंगाबाद ः राज्यसभेच्या ५७ जागांसाठी मार्च महिन्यात निवडणूक प्रक्रिया पार पडली होती. महाराष्ट्रातील सहा जागांपैकी मराठवाड्यातून तत्कालीन भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डाॅ. भागवत कराड यांची राज्यसभेवर वर्णी लागली होती. १८ मार्च रोजी बिनविरोध निवड झाल्यानंतर देखील कोरोनाच्या संकटामुळे त्यांना खासदार पदाची शपथ घेता आली नव्हती. आता पाच महिन्यांनी त्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला आहे. २२ जुलै रोजी राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदारांना शपथ देण्यात येणार आहे.

खासदार डॉ. भागवत कराड राज्यसभा सदस्यत्वाची २२ जुलै रोजी शपथ घेणार आहेत. राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांच्या दालनात हा शपथ विधी सोहळा सकाळी अकरा वाजता संपन्न होणार आहे. या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण राज्यसभा दुरचित्र वाहिनीवरून देखील केले जाणार आहे. महाराष्ट्रातून राज्यसभेवर  निवडूण पाठवायच्या सहा सदस्यांपैकी एक जागा मराठवाड्याच्या वाट्याला आली होती. मराठवाडा विकास महामंडळाचे अध्यक्ष व भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष असलेल्या डाॅ. भागवत कराड यांना अनपेक्षितपणे भाजप नेतृत्वाने संधी देण्याचा निर्णय घेतला होता.

राज्यातील एकनाथ खडसे, पंकजा मुंडे यांच्या सारख्या दिग्गज नेत्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित असतांना भाजपने चर्चेत नसलेल्या डाॅ. भागवत कराड यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला, याचे सगळ्यांनाच आश्चर्य वाटले होते. परंतु महाराष्ट्रातील राजकीय परिस्थीती माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी पक्षापासून राखलेले अंतर पाहता राज्याच्या राजकारणात निर्णयाक भूमिका बजावणाऱ्या वंजारी समाजाला प्रतिनिधित्व देत भाजपच्या राज्य व केंद्रातील नेतृत्वाने सोशल इंजिनिअरिंग साधल्याची जोरदार चर्चा त्यावेळी होती.

महाराष्ट्रातून १८ मार्च रोजी सहा जागेसाठी बिनविरोध निवड प्रकिया पूर्ण झाली. भाजपच्या कोट्यातून डॉ. भागवत कराड ,रामदास आठवले आणि छत्रपती उदयनराजे भोसले यांची बिनविरोध निवड करण्यात आली. देशभरात  कोरोना संसर्गाचे संकट निर्माण झाल्याने या सदस्यांचा शपथविधी सोहळा लांबणीवर पडला होता.  

डॉ.भागवत कराड यांच्या रूपाने औरंगाबाद शहराला राज्यसभेची  खासदारकी मिळाली कराड  हे मुळचे अहमदपूर तालुक्यातील असून, त्यांनी औरंगाबाद येथे शासकीय वैद्यकीय महविद्यालयात वैद्यकीय  शिक्षण पूर्ण केलेले आहे. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंढे यांच्या नेतृत्वाखाली नव्वदच्या दशकामध्ये भाजपच्या सक्रीय राजकारणात त्यांनी प्रवेश केला.

औरंगाबाद शहराचे दोनदा महापौरपद, भाजपा राज्य कार्यकारणी उपाध्यक्ष आणि  विविध आघाड्या आणि सेलच्या माध्यमातूनही त्यांनी  काम केले आहे. मराठवाडा  वैधानिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी दोन वर्ष होते. पक्षातील सामान्य पदाधिकाऱ्याला राज्यसभेवर संधी मिळाल्यामुळे त्यांच्या निवडीचेे सर्व स्तरातून स्वागत झाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com