मला गृहित धरू नका, म्हणत आमदार बाबाजानी दुर्राणींचा अध्यक्षपदावर डोळा

राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी देखील अध्यक्षपदासाठी कुटनिती आखण्यास सुरुवात केली आहे.
Parbhani District Bank- Bordikar-Mls Duarani News
Parbhani District Bank- Bordikar-Mls Duarani News

परभणी ः जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेच्या अध्यक्षपदासाठी वरपुडकर - बोर्डीकर या दोन मात्तबर नेत्यांनी रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. असे असले तरी दुसरीकडे वरपुडकरांकडून बोर्डीकरांच्या गटात आलेले राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी देखील अध्यक्षपदासाठी कुटनिती आखण्यास सुरुवात केली आहे. निवडणुकीचे निकाल जाहिर होताच त्यांनी आपल्याला कुणीही गृहीत धरू नये असे सांगून वरपूडकर- बोर्डीकर गटाला इशाराच दिला आहे.

परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेच्या पंचवार्षिक निवडणुकीचे निकाल मंगळवारी जाहिर झाले. यात कॉग्रेसचे आमदार सुरेश वरपुडकर यांच्या गटाकडे १० तर भाजपचे नेते माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या गटाकडे ९ सदस्य आहेत. तर दोन बंडखोर निवडून आले आहेत. त्यामुळे सुरुवातीला हे दोन बंडखोर कुणाकडे जातील यावरूनच बहुमत ठरेल असे वाटत होते.

मात्र आज अचानक आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी आपल्याला कुणीही गृहित धरू नये, असे स्पष्ट केल्यान एकच खळबळ उडाली आहे. याचा अर्थ राष्ट्रवादी कॉग्रेसचे विजयी झालेले चार संचालक हे आपल्याच बाजूचे आहेत असेच बाबाजानी दुर्राणी यांना सुचावायचे आहे?  राष्ट्रवादी कॉग्रेसच्या चार सदस्यामध्ये स्वतः दुर्राणी, आमदार राजू नवघरे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर व दत्तात्रय मायदंळे या चार जणांचा समावेश आहे.

म्हणून दुर्राणींना अध्यक्षपद खुणावतेय?

बाबाजानी दुर्राणी यांच्यासह इतर चार संचालक वेगळे निघाले तर याचा परिणाम म्हणून वरपुडकर गटाचे संख्याबळ हे ८ तर बोर्डीकर गटाचे संख्याबळ ७ वर येईल. त्यामुळे दोन्ही गटांना बहुमताचा आकडा गाठण्यासाठी राष्ट्रवादी कॉग्रेसच्या चार संचालकांसह दोन बंडखोराची मदत घ्यावी लागणार आहे. अर्थात राज्यात महाविकास आघाडीचे सरकार ज्या पध्दतीने स्थापन झाले. त्याच पध्दतीची रणनिती आखून दुर्राणी पाठिंब्यांच्या बदल्यात अध्यक्षपदासाठी आग्रह धरू शकतात.

जिल्हा बॅकेची तिजोरी सध्या रिकामी आहे असे सांगितले जात असले तरी जिल्हा बॅकेकडे साडे बाराशे कोटी रुपयांची कर्ज माफीची रक्कम व त्याच बरोबर आगामी पाच वर्षात ९०० ते १००० कर्मचाऱ्यांची होणारी मेगा भरती होणार असल्याने दुर्राणी यांना बॅंकेचे अध्यक्षपद खुणावत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे जे मला अध्यक्ष करतील त्याच्या मागे मी, असा सूचक इशाराच  दुर्राणी यांनी वरील विधानातून दिला असल्याचे बोलले जाते.

जिल्हा बॅकेच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर दुर्राणी यांच्या निवासस्थानातील एक फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये दुर्राणी यांच्या बाजूला भाजप आमदार मेघना बोर्डीकर तर दुसऱ्या बाजूला जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर हे होते. तिघेही गुलालात माखलेले होते. हा फोटो जाणिवपूर्वक सोशल मिडियावर व्हायरल केला तर नसावा? अशी चर्चा देखील आता सुरू आहे. 

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com