डाॅक्टरांची कमतरता भासू देऊ नका; आमदार मुंदडांच्या अधिष्ठातांना सूचना

आमदार नमिता मुंदडा यांनी अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील कोरोना उपचार व सुविधांचा आढावा घेतला.
Bjp Mla Nmita Mundada- Ambajogai Medical Hospital News Beed
Bjp Mla Nmita Mundada- Ambajogai Medical Hospital News Beed

अंबाजोगाई : रुग्णांची वाढती संख्या व डॉक्टरांची भासत असलेली कमतरतेचा मुद्दा आमदार नमिता मुंदडा यांनी उपस्थित केला. यावर अधिष्ठातांनी दिलेल्या उत्तराने समाधान न झाल्याने नमिता मुंदडा चांगल्याच भडकल्या. रुग्णालयातील उपचार सुविधा व मनुष्यबळाची परिस्थिती जाणून घेऊन इतर विभागातील डॉक्टरांना रुग्णसेवेसाठी कोविड कक्षात वर्ग करण्याची सुचना त्यांनी दिली.

बीड जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाची दुसरी लाट वेगात आहे. रुग्णसंख्याही रोज साडेतीनशे ते चारशेंच्या घरात आहे. अलिकडे रुग्णांचे तपासणीतील शेकडा प्रमाणही वाढून १५ टक्क्यांच्या घरात गेले आहे. अंबाजोगाईतील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय तसेच लोखंडी येथील जंबो कोविड रुग्णालय हे उपचाराचे दोन प्रमुख केंद्र आहेत.

मात्र, मधल्या काळात कोरोना संसर्ग ओसरल्यानंतर यंत्रणा सुस्त झाली आहे. त्यामुळे रुग्णांची हेळसांड होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार नमिता मुंदडा यांनी उपचार व सुविधांचा आढावा घेतला. नुकतीच त्यांनी लोखंडीच्या कोविड सेंटरला भेट देऊन आढावा घेतला होता. गुरुवारी त्यांनी स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयात आढावा घेतला. तसेच कोविड वार्डात जाऊन रुग्णांशी संवादही साधला.

कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी डॉक्टरांची संख्या वाढवा व रुग्णांना दर्जेदार सेवा उपलब्ध करून द्या, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, उपअधिष्ठाता डॉ. राजेश कचरे, कोविड कक्षाचे प्रमुख डॉ. सिद्धेश्वर बिराजदार, अधीक्षक डॉ. राकेश जाधव यांच्यासह रुग्णालयातील वरिष्ठ डाॅक्टर्स, अधिकारी यावेळी हजर होते.

रुग्णालयातील २७ व्हेंटीलेटर्स बंद पडल्याने रुग्णसेवेत अडथळे निर्माण होत आहेत. याची दक्षता घेण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. रुग्णांवर उपचार करण्यासाठी रेमिडीसीवर इंजेक्शनसह इतर औषधांचा मुबलक साठा आहे. औषधांची कसलीही कमतरता भासू देणार नाही, असे आश्वासन देतांनाच १० एप्रिल पर्यंत रुग्णालयात २५० सुसज्ज बेड कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी मुंदडा यांना दिली. 

व्हेंटीलेटर नादुरूस्त असले तरी १० नवे व्हेंटीलेटर लोखंडीसावरगावच्या रुग्णालयातून मागविण्यात आले आहेत. तर उर्वरित व्हेंटीलेटर जिल्हा स्थानिक विकास निधीतून खरेदी करण्यात येणार असल्याचे अधिष्ठाता डॉ. सुक्रे यांनी बैठकीत सांगितले. 

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com