कामकाजच होऊ द्यायचे नाही, ही सत्ताधारी-विरोधकांची मिलीभगत तर नाही?

सध्या एकीकडे विरोधक गोंधळ घालत आहेत, तर दुसरीकडे सत्ताधारी भाजप बहुमताच्या जोरावर आपल्याला हवी ती विधेयक मंजुर करून घेत आहेत.
Mp imtiaz jalil angry news aurangabad
Mp imtiaz jalil angry news aurangabad

औरंगाबाद ः संसदेचे अधिवेशन सुरू होऊन दोन आठवडे उलटून गेले. पण सत्ताधारी पक्षाचे हम करे सो कायदा आणि विरोधकांकडून गोंधळ घालत त्याला मिळणारी साथ यामुळे कामकाजाचे बारा वाजले. सत्ताधाऱ्यांना महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्न पेगासेस या विषयांवर चर्चा न करता आपल्याला हवी ती बीलं बहुमताच्या जोरावर मंजुर करून घ्यायची आहेत. (Don't let it work, isn't it a collusion between the ruling party and the opposition? Said, Aimim Mp Imtiaz Jalil, Aurangabad) तर काॅंग्रेस व इतर विरोधी पक्षही गोंधळ घालून त्यांना साथ देत आहे की काय? अशी शंका एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी उपस्थितीत केली आहे.

संसदेचे दोन आठवड्यांचे कामकाज कुठल्याही विषयावर चर्चा न होता संपले. आम्ही एखादा विद्यार्थी परीक्षेला तयारी करून जातो तसे आमच्या मतदारसंघातील प्रश्न घेऊन इथे येतो. (Loksabha Session Delhi)ज्यावर सभागृहात चर्चा होईल आणि सरकारकडून त्यावर उत्तर मिळेल,अशी आमची अपेक्षा असते. आम्ही फक्त इथे बंगल्यात राहायला आलेलो नाही, असा संतापही त्यांनी व्यक्त केला.

पेगासेस हेरगिरी प्रकरणासह देशातील महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्न यावर सरकार चर्चा करायला तयार नाहीत. याचा निषेध म्हणून विरोधकांकडून सभागृहात गोंधळ घातला जात आहे, त्यामुळे दोन आठवड्यांचा वेळ वाया गेला. आता उर्वरित काळात तरी कामकाज होऊन सरकारने सर्व विषयांवर चर्चेची तयारी दाखवावी, असे आवाहन इम्तियाज जलील यांनी एका मुलाखतीत बोलतांना केले.

इम्तियाज जलील म्हणाले, पेगासेस हे गंभीर प्रकरण आहे. तुमच्या माझ्या फोनमध्ये झाकण्याचा अधिकार सरकारला कुणी दिला हा खरा प्रश्न आहे. देशभरात यावरून वादंग सुरू असतांना सरकार या विषयावर चर्चा करण्यापासून पळ का काढतं आहे, हे कळायला मार्ग नाही. याशिवाय पेट्रोलचे वाढलेले दर, त्यामुळे उडालेला महागाईचा भडका, शेतकऱ्यांचे प्रश्न सरकारला गंभीर वाटत नाहीत का? विरोधकांनी देखील याचा विचार करण्याची गरज आहे.

सध्या एकीकडे विरोधक गोंधळ घालत आहेत, तर दुसरीकडे सत्ताधारी भाजप बहुमताच्या जोरावर आपल्याला हवी ती विधेयक मंजुर करून घेत आहेत. सरकारने विरोधकांच्या सगळ्या प्रश्नांवर चर्चेची तयारी दाखवावी आणि विरोधकांनी देखील गोंधळ न घालता सभागृहात कामकाज कसे होईल, यासाठी प्रयत्न करावेत.

आम्ही उपस्थित केलेले प्रश्न हे महत्वाचे नाही, असे सरकार म्हणू शकत नाही. सरकारला खरचं सभागृह चालवायचे असेल तर त्यांनी सोमवारपासून पेगासेससह सर्व विषयावर चर्चा करण्याची तयारी दर्शवावी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सभागृहात येऊन तशी घोषणा करावी, अशी मागणीही इम्तियाज जलील यांनी यावेळी केली.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com