जिल्ह्यात काॅंग्रेसचा खासदार, आमदार नाही म्हणून निराश होऊ नका; मी तुमच्यासोबत..

काँग्रेसचे नेते राहुल गांधी,अध्यक्षा सोनिया गांधी या आपल्या सगळ्यांच्या सोबत आहेत. तेव्हा खचून जाऊ नका, जोमाने कामाला लागा.
Congress Minister Nitin Raut News Aurangabad
Congress Minister Nitin Raut News Aurangabad

औरंगाबाद : जिल्ह्यात कॉंग्रेसचा आमदार किंवा खासदार नाही म्हणून निराश होऊ नका, तुम्ही एकटे नाहीत, मी तुमच्या सोबत आहे, असा धीर ऊर्जामंत्री व काँग्रेसचे अखिल भारतीय अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष डॉ नितीन राऊत यांनी काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांना दिला. (Don't be disappointed as there is no Congress MP or MLA in the district; I am with you) मतभेद, निराशा आणि आळस झटकून जोमाने कामाला लागा, काॅंग्रेसला पुन्हा गतवैभव मिळाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

नितीन राऊत दोन दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यानिमित्त औरंगाबाद येथे आले आज आले होते. शहरातील गांधी भवनात त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. काँग्रेसची विचारधारा ही राज्यघटनेची विचारधारा आहे. (Energy Minsiter Nitin Raut) काँग्रेस केवळ एक पक्ष नसून एक विचार आहे. समता, बंधुता आणि  स्वातंत्र्याचे विचार हे काँग्रेसच्या राजकीय विचारधारेचा भाग असल्याचे राऊत म्हणाले.

जिल्ह्यात काॅंग्रेसचा आमदार, खासदार नाही म्हणून निराश होऊ नका, मी तुमच्यासोबत आहे, काँग्रेसचे नेते राहुल गांधी,अध्यक्षा सोनिया गांधी या आपल्या सगळ्यांच्या सोबत आहेत. तेव्हा खचून जाऊ नका, जोमाने कामाला लागा. औरंगाबाद महानगरपालिका निवडणूकीत जी मदत लागेल ती जिल्हाध्यक्ष,शहराध्यक्षांनी सांगावी, ती मदत मी करायला तयार असल्याचे राऊत यांनी यावेळी सांगितले. 

विदर्भ-मराठवाडा भेद मानत नाही..

महामानव  डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाचे निर्माण केल्यानंतर औरंगाबाद शहराला शिक्षण क्षेत्रातील क्रांतीसाठी निवडले. म्हणून औरंगाबाद शहर मला अधिक प्रिय आहे. विदर्भ आणि मराठवाडयात अनेक साम्य आहे, त्यामुळे मराठवाडा विदर्भ असा भेद मानत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष व माजी आमदार कल्याण काळे, माजी आमदार नामदेव पवार, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मीनाताई शेळके, शहर अध्यक्ष हिशाम उस्मानी, महाराष्ट्र प्रदेश अनुसूचित जाती काँग्रेसचे कार्याध्यक्ष डॉ. जितेंद्र देहाडे, महिला काँग्रेस शहर जिल्हा अध्यक्ष सीमा थोरात, अरूण शिरसाट उपस्थित होते.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com