डाॅक्टर मंत्री झाले म्हणून जल्लोष, अन् कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल.. - As a doctor became a minister, Jallosh and other activists were charged. | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी

डाॅक्टर मंत्री झाले म्हणून जल्लोष, अन् कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल..

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 8 जुलै 2021

डाॅ. भागवत कराड यांच्या रुपाने औरंगाबाद जिल्ह्याला स्वातंत्र्यपुर्व काळानंतर पहिल्यांदाच केंद्रात प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली.

औरंगाबाद ः भाजपचे राज्यसभेतील खासदार डाॅ. भागवत कराड यांचा कालच्या मंत्रीमंडळ विस्तारात समावेश करण्यात आला. वर्षभरापुर्वीच खासदारकी आणि लगेच केंद्रा राज्यमंत्रीपद मिळाल्यामुळे पक्षातील अनेकांना याचा धक्का बसला. (As a doctor became a minister, Jallosh and other activists were charged.) पण यातून सावरत त्यांना आपल्या `डाॅक्टर`, (त्यांचे समर्थक त्यांना डाॅक्टर म्हणतात) कराड यांना शुभेच्छा देण्यासाठी शहरातील भाजप जिल्हा कार्यालयासमोर सायंकाळी गर्दी केली होती.

डाॅक्टारांचा शपशविधी सोहळा याची देही याची डोळा पाहता यावा यासाठी कार्यालयासमोर एक भला मोठा स्क्रीन देखील लावण्यात आला होता. ` मै भागवत काशीनाथरा कराड, शपथ लेता हू` असे शब्द कानी पडताच तिथे जमलेल्या शेकडो कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. ढोल-ताशे, फटाक्यांची आतषबाज आणि गुलालाची उधळण करत हा जल्लोष साजरा झाला खरा, पण या आनंदाच्या भरात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना कोरोना नियमांचे मात्र भान राहिले नाही. (Bjp Central State Minister Dr. Bhagwat Karad) परिणामी पोलिसांनी भाजपच्या ५०-६० कार्यकर्त्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

त्यामुळे डाॅक्टर मंत्री झाल्याचा एकीकडे आनंद तर दुसरीकडे गुन्हे दाखल झाल्याचे दुःखही भाजप कार्यकर्त्यांना झाले. डाॅ. भागवत कराड यांच्या रुपाने औरंगाबाद जिल्ह्याला स्वातंत्र्यपुर्व काळानंतर पहिल्यांदाच केंद्रात प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. शिवाय केंद्रात अर्थ खात्यासारखे महत्वाचे खाते मिळाल्यामुळ देखील भाजपमधील अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. परंतु ओबीसी आणि जातीय समीकरणाचा समतोल राखण्याच्या धोरणामुळे कराड यांची एकदा नव्हे तर वर्षभरात दुसऱ्यांदा लाॅटरी लागली.

कराड यांच्या मंत्रीपदाचा आनंद उस्मानपुरा येथील जिल्हा कार्यालयासमोर साजरा करण्यात आला. जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष, महिला आघाडीच्या पदाधिकारी व भाजपचे कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोरोनाची तिसऱ्या लाटेची शक्यता, डेल्टा प्लसचे रुग्ण पाहता शहरात निर्बंध लागू करण्यात आले आहेत. जमावबंदी आदेश असल्यामुळे गर्दी जमवून सार्वजिक ठिकाणी कुठल्याही प्रकारचा कार्यक्रम घेण्यावर बंदी आहे.

मात्र याकडे दुर्लक्ष करत भाजपच्या कार्यकर्त्यांनी सांयकाळी जिल्हा कार्यालयासमोर आंनदोत्सव साजरा केला. एकमेकांना पेढे भरवत, फटाके वाजवत हा जल्लोष झाला. मात्र कोरोना नियम पायदळी तुडवत सार्वजनिक ठिकाणी गर्दी जमवून कार्यक्रम घेतल्या प्रकरणी वेदांतनगर पोलिस ठाण्यात ५०-६० भाजप कार्यकर्त्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

हे ही वाचा ः आंबेडकरांची मोठी घोषणा, तीन महिने पक्षापासून दूर राहणार..

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख