दुखणं अंगावर काढू नका, लपवूही नका; आमदारांची नागरिकांना हात जोडून विनंती..

अहवाल पॉझिटिव्ह आला तर न घाबरता तातडीनं डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार सुरू करावा. सर्वांच्या एकजुटीतून, सर्वांच्या प्रयत्नांतून आपल्याला आजचे चित्र बदलता येईल.
Congress Mla Dhiraj Deshmukh-Appeal People News Latur
Congress Mla Dhiraj Deshmukh-Appeal People News Latur

लातूर : माझी आपणा सर्वांना हात जोडून विनंती आहे, आपण कुठलंही आजारपण अंगावर काढू नका आणि ते लपवूही नका. हे आजारपण कोरोनाचं लक्षण असू शकतं. त्यामुळे न घाबरता ताबडतोब तपासणी करून घ्या. डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार सुरू करा. आपली जागरूकताच कोरोना संसर्गाची साखळी तोडू शकते, अशा शब्दांत आमदार धिरज देशमुख यांनी नागरिकांना आवाहन केले.

मुरुड येथील कोविड केअर सेंटर, तांदुळजा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, बावची येथील कोविड केअर सेंटर, रेणापूर येथील ग्रामीण रुग्णालय,बारा नंबर पाटी येथील कोविड केअर सेंटर अशा वेगवेगळ्या ठिकाणी देशमुख यांनी भेटी दिल्या. येथील आरोग्य व्यवस्थेचा व उपाययोजनांचा आढावा घेत डॉक्टर, ग्रामस्थ आणि कोरोनाबाधित रुग्णांशी त्यांनी संवाद साधला.

यावेळी आजारपण अंगावर काढल्याने कोरोनाग्रस्तांचे प्रमाण वाढत असल्याचा निष्कर्ष पुढे आला. या पार्श्वभूमीवर धिरज देशमुख यांनी नागरिकांना हाते जोडत आरोग्याबाबत जागरूक राहण्याचे आवाहन केले.

कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. लहान मुलेही आता कोरोनाबाधित होऊ लागली आहेत. त्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य आपण सर्वांनी ओळखायला हवे. केंद्र-राज्य सरकार व आरोग्य विभागाने सांगितलेल्या आरोग्यविषयक नियमांचे काटेकोर पालन करायला हवे. कुठलेही आजारपण अंगावर न काढता तातडीने तपासणी करून घ्यावी.

अहवाल पॉझिटिव्ह आला तर न घाबरता तातडीनं डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार सुरू करावा. सर्वांच्या एकजुटीतून, सर्वांच्या प्रयत्नांतून आपल्याला आजचे चित्र बदलता येईल, असा विश्वास त्यांनी या भेटी दरम्यान, रुग्ण व अन्य नागरिकांना दिला.

दरम्यान, धिरज देशमुख यांनी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांचीही नुकतीच भेट घेतली. ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने पुरेसे बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर या अतिआवश्यक आरोग्य सुविधा तातडीने उपलब्ध व्हाव्यात,अशी मागणीही त्यांनी केली. कोरोनाबाधित रुग्णांना उपचारासाठी शहरात येण्याची गरज भासू नये,  त्यांना आपल्याच भागात आणि वेळेवर उपचार मिळावेत, अशा सूचनाही देशमुख यांनी या भेटीत केल्या. 

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com