लाॅकडाऊन काळात वीज तोडणी, महापालिकेची वसुली करू नका

सध्या मार्च अखेर सुरू असल्यानेमहानगरपालिकेने वसुलीसाठी पथक निर्माण केले आहेत. लोक संकटात असतांना महानगरपालिकेची वसुली जोरात सुरू आहे.
Bjp Mp Dr. Karad Appeal news Aurangabad
Bjp Mp Dr. Karad Appeal news Aurangabad

औरंगाबाद : जिल्हा प्रशासनाने संपूर्ण टाळेबंदीचा  निर्णय घेतला आहे. कोरोनाचे संकट उभे असतानाच महापालिका आणि महावितरण यांनी मार्च महिन्याचे कारण पुढे करत वसुली सुरू केली आहे. लाॅकडाऊन कुठल्याही नागरिकाचे वीज कनेक्शन तोडू नये, किंवा महापालिकेने कराची वसुली करू नये, अशी मागणी भाजपचे खासदार डाॅ. भागवत कराड यांनी केली आहे.

जिल्ह्यात ३० मार्च ते ८ एप्रिल दरम्यान पुर्ण लाॅकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे राज्यसभेतील खासदार डाॅ. भागवत कराड यांनी काही मागण्या केल्या आहेत. त्यात प्रामुख्याने वीज कनेक्शन तोडू नका, महापालिकेने मालमत्ता कराची वसुली सक्तीने करू नये याचा समावेश आहे. या शिवाय कोरोना रुग्णांना बेड उपलब्ध करून देणे, लसीककरण मोहिमेला वेग देणे या विषायवर देखील कराड यांनी आपली भूमिका मांडली.

डाॅ.कराड म्हणाले, कोरोना रुग्णाचा वाढता संसर्ग लक्षात घेता, रुग्णांना बेड उपलब्ध करून देणे , रुग्णांना उपचार सुविधा वेळेवर देणे यासह ग्रामीण भागामध्ये बाधितांचे प्रमाण वाढत असल्याने जास्तीत जास्त लसीकरण केंद्रे सुरू करणे आवश्यक आहे. या संदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्यात येईल, असे स्पष्ट करत याबाबत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना सूचना केल्या आहेत.

त्यामुळे जिल्हा प्रशासनाने लसीकरणाची मोहीम वाढविण्याची आवश्यकता आहे. सध्या ग्रामीण भागात संसर्गाचा वेग वाढत आहे. त्यामुळे शहरी आणि ग्रामीण या दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणात लसीकरण केंद्रे सुरू करावी, इतकेच नव्हे तर मोठ्या कंपन्या व कारखाने यामध्ये कामगारांचे देखील लसीकरण करून घेण्यावर भर देण्यात यावा. 

मोठ्या कारखान्यांनी त्या ठिकाणी लसीकरण कॅम्प सुरू करावे, जेणेकरून कामगारांना त्याचा फायदा होईल. सध्या शहरांमध्ये ४५ आणि ग्रामीण भागामध्ये ६० इतकी लसीकरण केंद्रे आहेत. वाढत्या संसर्गाचा वेग लक्षात घेऊन लसीकरण केंद्रे सुरू करावीत,अशी मागणी देखील कराड यांनी केली आहे.

सध्या मार्च अखेर सुरू असल्याने  महानगरपालिकेने वसुलीसाठी पथक निर्माण केले आहेत. लोक संकटात असतांना महानगरपालिकेची वसुली जोरात सुरू आहे. तशीच स्थिती महावितरणची देखील आहे. विद्युत बिलाच्या वसुलीसाठी कनेक्शन तोडण्यासाठी महावितरणचे अधिकारी सर्वसामान्यांना  वेठीस धरत आहेत.

मागेल त्याला बेड, उपचार द्या

आपत्कालीन स्थितीमध्ये  वीज बिलात सवलत द्यावी, आणि कोणत्याही नागरिकाचे कनेक्शन कट करू नये, अशा सूचना महावितरणच्या अधीक्षक अभियंता यांना देण्यात याव्यात अशी मागणीही  डॉ. कराड यांनी केली आहे. मागेल त्याला उपचार आणि बेडची उपलब्धता करून देण्यासंदर्भात तात्काळ पावले उचलावीत.तशा सूचना जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिकारी यांना देण्यात आल्या असून त्याची अंमलबजावणी प्रशासनाकडून होणे आवश्यक आहे, असेही कराड म्हणाले.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com