जिल्हाधिकाऱ्यांनी मनसेच्या शिष्टमंडळाला भेटच दिली नाही.. - The District Collector did not visit the MNS delegation. | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

जिल्हाधिकाऱ्यांनी मनसेच्या शिष्टमंडळाला भेटच दिली नाही..

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 2 जुलै 2021

लाॅकडाऊन आणि निर्बंधांमुळे आधीच लोक, व्यापारी, छोटे-मोठ्या व्यावसायिक हे मेटाकुटीला आलेले आहेत.

औरंगाबाद ः शहरातील कोरोना रुग्णांची संख्या अंत्यत कमी झाली आहे, त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना दिलेल्या अधिकाराचा योग्य वापर करून लाॅकडाऊनचे नियम शिथील करावेत. सकाळी सात ते चार ऐवजी सायंकाळी सात पर्यंत दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी द्यावी, अशा मागणीचे निवेदन घेऊन मनसेचे जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्ष जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी गेले होते. (The District Collector did not visit the MNS delegation.) परंतु ते मिटिंगमध्ये असल्याचे सांगण्यात आल्यामुळे अर्धातास वाट पाहून मनसेचे शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांना न भेटताच माघारी फिरले.

जिल्हाधिकाऱ्यांनी मनसेच्या शिष्टमंडळाला भेटणे टाळल्याची चर्चा या निमित्ताने होत आहे. मनसेचे जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांनी दोन दिवसांपुर्वीच सोशल मिडियाच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना अल्टीममेटम देत निर्बंध शिथील करण्याचे आवाहन केले होते. (Maharashtra Navnirman Sena District Chief Suhash Dasrathe) आज तो अल्टीमेटम संपल्यानंतर दाशरथे, शहराध्यक्ष सतनामसिंग गुलाटी हे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना भेटण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात गेले होते. परंतु अर्धातास थांबून, निरोप देऊन देखील चव्हाण मनसेच्या शिष्टमंडळाला भेटायला आले नाही. ते मिटिंगमध्ये असल्याचा निरोप त्यांच्या पीएने दिला. 

प्रसार माध्यमांशी बोलतांना दाशरथे म्हणाले, महाविकास आघाडी सरकारने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार दिले आहेत. कोरोनाची स्थानिक परिस्थिती, रुग्ण संख्या पाहून निर्बंधाबाबत निर्णय घेण्याची मुभा या अधिकाराच्या माध्यमांतून देण्यात आली आहे. परंतु ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे, तिथलेच नियम जिल्हाधिकारी सुनील चव्हाण हे आपल्या शहरात देखील लादत आहेत. हे पुर्णपणे चुकीचे आहे. लाॅकडाऊन आणि निर्बंधांमुळे आधीच लोक, व्यापारी, छोटे-मोठ्या व्यावसायिक हे मेटाकुटीला आलेले आहेत.

लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. प्रत्येक जण या संकाटाचा सामना करत आहे. अशावेळी त्यांना आपले व्यवसाय, व्यवहार सुरू ठेवण्यासाठी अधिकची सवलत देणे गरजेचे आहे. परंतु डेल्टा प्लसची भिती दाखवून आणि स्थानिक सत्ताधारी लोकप्रतिनिधीच्या दबावत येऊन जिल्हाधिकारी काम करत आहेत. चार नंतर डेल्टा प्लस येणार नाही, असा फोन त्याने जिल्हाधिकाऱ्यांना केला आहे का?  असा प्रश्न या निमित्ताने पडतो.

जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या अधिकाराचा योग्य वापर करून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, त्यासाठी आता सकाळी सात ते दुपारी चारपर्यंत व्यवहार सुरू ठेवण्याची जी परवानगी देण्यात आली आहे, त्यात आणखी तीन तासांची वाढ करून ती सायंकाळी सातपर्यंत करावी, अशी आमची रास्त मागणी आहे. परंतु जिल्हाधिकारी सत्ताधाऱ्यांच्या हातचे बाहुले झाले आहेत, ते जनतेला वेठीस धरत आहेत, असा आरोप देखील सुहास दाशरथे यांनी केला आहे.

हे ही वाचा ः आपल्याच गाडीवर दगड मारून घेतला असेल काय सांगावे? अजित पवारांनी उडवली पडळकरांची खिल्ली..

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख