जिल्हा बॅंकेचा खेळखंडोबा मान्य नाही, म्हणून निवडणूकीवर बहिष्कार

सहकार मंत्र्यांवर दबाव आणून हवे तसे निर्णय घेतले जात आहेत. न्यायालयातही सरकारने चुकीची माहिती दिली.
Beed district Bank- Dhanjay Munde- Pankaja Munde News
Beed district Bank- Dhanjay Munde- Pankaja Munde News

बीड: राज्यातील आणि जिल्ह्यातील सत्ताधाऱ्यांच्या कारभाराचा निषेध म्हणून आम्ही जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा निषेध करत बहिष्कार टाकत असल्याची घोषणा भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी केली. बँकेत आम्ही वरचढ असल्याने कारस्थाने करुन सुरळीत चालणाऱ्या जिल्हा बँकेला आवसायनात आणून प्रशासक आणण्याचे कारस्थान सत्ताधारी करत असल्याचा आरोपही मुंडे यांनी केला. आम्हाला मानणारे मतदार मतदानाकडे फिरकणार नाहीत असेही मुंडे म्हणाल्या.

जिल्हा बँकेच्या आठ जागांसाठी शनिवारी (ता. २०) मतदान होत आहे. आदल्या दिवशी शुक्रवारी (ता. १९) पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत विरोधकांवर आरोप केले. राज्यातले सरकार आणि जिल्ह्यातले सत्ताधारी यांचे जसे कारभार आहेत तसेच ते जिल्हा बॅंकेच्या बँकेबाबतही वागत आहेत.

लोकशाही प्रक्रीया म्हणून आम्ही निवडणुकीकडे पाहत होतो. बँकेला कर्जामध्ये बुडविणाऱ्यांना सहा वर्षे बाजूला ठेवून कारभार केला. ९० टक्के ठेवीदारांच्या ठेवी दिल्या, तोट्यातली बँक शंभर कोटी नफ्यात आणली. परभणी व औरंगाबाद बँकेबाबत वेगळा न्याय आणि बीडबाबतच वेगळा का, असा सवाल पंकजा मुंडे यांनी उपस्थित केला. 

सहकार मंत्र्यांवर दबाव आणून हवे तसे निर्णय घेतले जात आहेत. न्यायालयातही सरकारने चुकीची माहिती दिली. आता होणाऱ्या निवडणुकीतून विजयी झालेल्यांचा कोरम पुर्ण होणार नाही आणि प्रशासक येईल म्हणून सर्वच जागांची निवडणुक व्हावी यासाठी आम्ही न्यायालयीन लढाईही लढली.

असा प्रकार कधीच पाहिला नाही, हा प्रकार पालकमंत्री व राष्ट्रवादी नेत्यांनी केला असून हा खेळखंडोबा मान्य नसल्यानेच निवडणूकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या. माजी आमदार भिमसेन धोंडे, रमेश आडसकर, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, अक्षय मुंदडा, विजयकांत मुंडे, भारत काळे, अशोक लोढा आदींची यावेळी  उपस्थिती होती.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com