रेल्वे राज्यमंत्री रावासहेब दानवे यांच्या `या` फोटोची चर्चा..

दानवे यांचा समोर आलेला हा नवा अवतार पाहून त्यावर चर्चा होणार नाही तर नवलच.
रेल्वे राज्यमंत्री रावासहेब दानवे यांच्या `या` फोटोची चर्चा..
Railway state Minister Raosaheb Danve-News Aurangabad

औरंगाबाद ः केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे सध्या मनिपूर राज्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी इम्फाळ येथील रेल्वेस्थानक व रेल्वेच्या विविध प्रकल्पांना भेट देत पाहणी केली. प्रत्येक राज्याची एक संस्कृती असते, आणि त्या पद्धतीने तिथे आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले जाते. रावसाहेब दानवे यांचे असेच पारंपारिक पद्धतीने इम्फाळ येथे स्वागत करण्यात आले. या स्वागतांच्या वेळी एक विशिष्ट टोप, गळ्यात एखादी पिशवी वाटावी अशी एक वस्तू त्यांना घालण्यात आली आहे. हा फोटो सध्या सोशल मिडियावर चांगलाच चर्चेत आला आहे.

रावसाहबे दानवे केंद्रात रेल्वे राज्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी आपल्या मतदारसंघात व इतर भागात काढलेली जनआशिर्वाद यात्रा आणि त्या दरम्यान केलेली भाषणं, विरोधकांवर केलेली टीका, आणि त्यांना उद्देशून दिलेले विशेषणं यामुळे राजकीय वर्तुळात मोठे वादंग निर्माण झाले होते. काॅंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे बिनकामाचे बैल, मोकाट सांड असल्याची दानवे यांनी केलेली टीका संपुर्ण देशात चर्चेचा आणि वादाचा विषय ठरली होती.

या पार्श्वभूमीवर दानवे यांचा समोर आलेला हा नवा अवतार पाहून त्यावर चर्चा होणार नाही तर नवलच. गेली ३५-४० वर्ष राजकारणात, गावचे सरंपच ते केंद्रांत दोनवेळा राज्यमंत्री दोनदा आमदार व सलग पाचवेळी लोकसभा निवडणूक जिंकण्याचा विक्रम असलेला रांगडा आणि आपली ग्रामीण शैली, भाषा बाळगणारा नेता. हाऊमच या एका वाक्यावर जगातील बारा देश फिरून आलो अस अभिमानाने सांगणारे, स्वतःची ओळख बारा भोकश्याचा पान्हा, म्हणजे कुठल्याही पठडीत फीट बसणारा, अशी करून देणारे रावसाहेब दानवे राजकारणातील एक अवलिया म्हटले तर वावगे ठरणार नाही.

शेतकरी, शेतात नांगर, ट्रॅक्टर चालवणारे, म्हशीची धार काढणारे आणि एवढेच नाही तर बैलाच्या तोंडात हात घालून त्याचे दात मोजतांनाचे अनेक त्याचे छायाचित्र प्रसिद्ध झालेले आहेत. आपल्या ग्रामीण भाषा आणि शैलीवर प्रचंड प्रेम आणि विश्वास असल्याचे पदोपदी सांगणारे दानवे यांची राजकीय भाषण करतांना अनेकदा जीभ घसरल्याचे देखील पहायला मिळाले. पण कुठल्याही वादातून सहीसलामत सुटत आपलंच खरं करून दाखवण्यात त्यांचा हातखंडा आहे.

जालना या आपल्या मतदारसंघातील एका गावांत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशासाठी किती काम करतात हे पटवून देण्यासाठी दानवे यांनी एक उदाहरण दिले होते. ते देतांना काॅंग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा गावांत फिरणारा, मोकाट सांड, बिनकामाचा बैल असा उल्लेख दानवे यांनी केला होता. त्यांच्या या विधानाचा नंतर काॅंग्रेसने राज्यभरात निषेध करत आंदोलनही केले. पण या वादातून देखी ते सहसलामत सुटले.

दानवे यांचे इम्फाळमध्ये झालेले पारंपारिक स्वागत आणि त्याचा समोर आलेला फोटो पाहून या सगळ्या वादाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. आता हा फोटो पाहून दानवे यांचे चाहते आणि विरोधक काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

Edited By : Jagdish Pansare

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in