करुणा धनंजय मुंडे यांची प्रेमकथा लवकरच पुस्तकात; पोस्टमुळे टिव्सट.. - Dhananjay Munde's love story soon in book; Karuna's post .. | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजासाठी केलेल्या मागण्या मान्य करण्याची राज्य सरकारची तयारी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संभाजीराजे छत्रपती यांची उद्या (17 जून) पाच वाजता वर्षा निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक

करुणा धनंजय मुंडे यांची प्रेमकथा लवकरच पुस्तकात; पोस्टमुळे टिव्सट..

दत्ता देशमुख
गुरुवार, 13 मे 2021

एका तरुणीने काही महिन्यांपूर्वी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर अत्याचाराचे आरोप केल्यानंतर खुद्द मुंडे यांनीच या तरुणीची बहिण करुणा मुंडे यांच्यासोबत परस्पर सहमतीने संबंध असल्याचे व दोन मुले असल्याचे जाहिर केले होते.

बीड : करुणा धनंजय मुंडे यांनी आणखी एक पोस्ट सोशर मिडीयावर शेअर करुन नवे ट्विस्ट निर्माण केले आहे. ‘स्वत:च्या जीवनावर आधारीत सत्यप्रेम जीवनगाथा लवकरच प्रकाशित होण्याच्या र्मार्गावर असून त्याचे प्रकाशन लवकरच केले जाणार असल्याचा मजकूर या पोस्टमध्ये आहे. ( Ncp Minister Dhananjay Munde's love story soon in book; Karuna's post ) त्याखाली ‘COMING SOON‘ एक प्रेमकथा लवकरच, आश्चर्यजनक प्रेमकथा असे स्वत:च्या फोटो व नावासह असलेले पोस्टरही टाकले आहे. त्यामुळे या पुस्तकरुपी प्रेमकथेतून त्या नेमकं काय मांडणार, कोणत्या प्रकरणांचा उलगडा करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पुर्वी अगदी निकटवर्तीयांना माहित असलेल्या करुणा या मागच्या काही महिन्यांपासून चर्चेत आल्या. कारण, त्यांच्या लहान बहिणीने राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर अत्याचाराचे आरोप केल्यानंतर खुद्द धनंजय मुंडे यांनीच आरोप फेटाळून लावत करुणा मुंडे यांच्यासोबतच्या संबंधांचा स्व:त कबुली दिली.

अगदी दोन मुले असून त्यांचे पालकत्व स्विकारल्याचे, त्यांच्या भावाला व्यवसायात मदत केल्याचे आणि प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याचे सांगीतले. सोशल मिडीयावर मजकूर प्रसिद्ध करण्याबाबतही न्यायालयाचे निर्बंध असून न्यायालयात तडजोडीची प्रक्रीया सुरु असल्याचेही सांगीतले.

दरम्यान, तरुणीच्या आरोपानंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीने जोरही धरला होता. पण, ऐनवेळी आरोप करणाऱ्या तरुणीने ‘यु टर्न’ घेतला. (After Dhananjay Munde's revelation, Karuna Munde came into the discussion.) मात्र, धनंजय मुंडे यांच्या खुलाशानंतर करुणा मुंडे चर्चेत आल्या. त्या एका सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रातही कार्यरत असून सोशल मिडीयावरही नेहमी सक्रीय असतात.

मंगळवारी (ता. ११) त्यांनी सोशल मीडियावरुन पुस्तकाच्या माध्यमातून प्रेमकथा प्रकाशित करणार असल्याचे जाहीर केल्यानंतर त्यांच्या पोस्टला विविध प्रकारच्या कमेंटही येत आहेत. आता त्या या प्रेमकथेतून कोणता उलगडा करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.(It will be interesting to see what will unfold from this love story.) करुणा धनंजय मुंडे यांच्या पोस्टचे स्क्रीनशॉट बुधवारी सोशल मीडियावर व्हायरल झाले. या 'लव्ह स्टोरी'चे रहस्य जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता लागल्याचे अनेकांनी कमेंटमधून सांगीतले.

हे ही वाचा : पंतप्रधान निधीतून दिलेल्या व्हेंटिलेटरची चौकशी करा, रुग्णांच्या जीवाशी खेळ नको..

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख