परळीकरांसाठी धनंजय मुंडेच्या संकल्पनेतून 'सेवाधर्म - सारं काही समष्टीसाठी' 

उपक्रमांतर्गत १०० खाटांचे खास महिलांसाठी विलगीकरण केंद्र तर कोरोनाबाबधीतांच्या कुटूंबातील विवाहासाठी १० हजारांची मदत दिली जाणार आहे.
minister dhnanjay munde news Parli-beed
minister dhnanjay munde news Parli-beed

बीड : परळीचे आमदार व जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून परळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने परळीकरांसाठी 'सेवाधर्म - सारं काही समष्टीसाठी' हा उपक्रम शुक्रवारपासून सुरू केला आहे. (Gardiuan Minister Dhnanjay Munde Start New Project for corona in Concituency) कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात परळीकरांसाठी हा उपक्रम निश्चितच दिलासा देणारा ठरणार आहे.

उपक्रमांतर्गत सौम्य लक्षणे असलेल्या  महिलांसाठी परळीत मोफत व सर्व सुविधांयुक्त शंभर खाटांच्या स्वतंत्र आयसोलेशन सेंटरची सुरुवात करण्यात आली आहे. (Help Ten Thousand for  corona Family) त्याचबरोबर कोरोनाबाधित असलेल्या परळीतील  गरीब व गरजू कुटुंबातील सदस्यांच्या विवाहासाठी १० हजारांचा मदत निधीही दिला जाणार आहे.

परळीतील नागरिकांची लसिकरण केंद्रपर्यंत ने - आण करण्यासाठी मोफत सिटी बस सेवा देखील सुरू करण्यात आली आहे. कोरोनाबाधित रुग्ण व कुटुंबियांना कोरोना सुरक्षा किटचे वितरण करण्यात येणार आहे. (corona kit also Dsitribute) या सुरक्षा किटमध्ये शरीरातील ऑक्सीजन पातळी मोजण्याकरीता पल्स ऑक्सी मिटर, सॅनिटायझर बॉटल्स, मास्क्स, साबण व इतर उपयोगी वस्तूंचा समावेश असेल.

सेवाधर्म अंतर्गत शहरात राष्ट्रवादी आधार केंद्र सुरु करून याद्वारे ऑनलाइन लसीकरण नोंदणी, वैद्यकीय सहाय्यता, मोफत भोजन व्यवस्था,  मोफत वाहतूक व्यवस्था, रक्त पेढी समन्वय, कोरोना चाचणी मदत, यासह विलगीकरण कक्षात प्रवेश मिळण्यासाठी सहाय्यता करण्यात येईल. (Free Midical, Lunch and other facility Provied)

कोरोना योद्ध्यांना विमा संरक्षण

परळीतील सर्व दवाखान्यातील आरोग्यसेवकांना स्टीलचा टिफिन प्रोत्साहनपर स्वरुपात भेट देण्याचे नियोजन देखील करण्यात आले आहे. स्वतःचा जीव धोक्यात घालून कोरोना प्रादुर्भावात कार्य करणाऱ्या कोरोना योध्दयांचे विमा पॉलिसीने संरक्षण करण्यात आले आहे. (Coroana Warriors coverd Insurance)नगर परिषदेच्या शहर निर्जन्तुकीकरण  मोहिमेला अधिक बळकट करण्यासाठी फवारणी यंत्राचे  लोकार्पण करून जिथे मागणी तिथे तात्काळ फवारणी करण्यात येईल.

उन्हाचा वाढलेला पारा लक्षात घेऊन शहरातील सर्व लसिकरण केंद्र, कोविड सेंटर, विलगीकरण केंद्र, चाचणी केंद्र आदि ठिकाणी मंडप व  आसन व्यवस्था करुन निवारा केंद्र उभी केली जाणार आहेत. त्याचबरोबर जास्तीत जास्त लसीकरण व्हावे  या हेतुने लसीकरण करण्यासाठी व्यापक जनजागृति मोहिमेस सुरुवात करण्यात येईल. कोरोना संसर्ग पूर्णपणे नियंत्रणात येईपर्यंत हा उपक्रम सुरू राहणार आहे. 

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com