बीड जिल्ह्यात येणारा विकास निधी गावांपर्यंत जात नाही; क्षीरसागरांची ठाकरेंकडे तक्रार..

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या निवडक नेत्यांशी ऑनलाईन संवाद साधला. मराठवाडा आणि जिल्ह्याच्या विकासाचे अनेक मुद्दे जयदत्त क्षीरसागर यांनी मांडले.
Beed political news
Beed political news

बीड : विकास कामांसाठी आलेला निधी गावांपर्यंत आणि कार्यकर्त्यांपर्यंत जाणे अपेक्षीत आहे. जिल्ह्यात मात्र तसे होत नाही, अशी  तक्रार शिवसेनेचे माजी मंत्री जयदत्त  
क्षीरसागर यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. (Development funds coming to Beed district do not reach the villages; Kshirsagar's complaint to Thackeray) शनिवारी (ता. १२) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या निवडक नेत्यांबरोबर ऑनलाईन संवाद साधला. यावेळी  क्षीरसागर यांनी विविध मुद्दे मांडले. त्यांनी विकास कामांच्या निधीवरुन चांगलाच बॉम्ब टाकला.

राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस असे महाविकास आघाडीचे सरकार असले तरी जिल्ह्यातील सत्तासमिकरणांत शिवसेनेचा एक गट कायम दुर आहे. जिल्ह्याचे पालकमंत्रीपद राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांच्याकडे असून दोघेही पुर्वी राष्ट्रवादीत असताना एकमेकांचे विरोधक म्हणून ओळखले जात. (Ex Minister Shivsena Leader Jaydatta Kshisrsagar) आता जयदत्त क्षीरसागर यांचे पुतणेच बीड विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करत असल्याने या मतदार संघातील विकास कामे, निधी वाटपात संदीप क्षीरसागर यांच्याच शिफारशींना स्थान आहे.

त्यामुळे राज्यातील व जिल्ह्यातील नव्या सत्तासमिकरणा नंतर जयदत्त क्षीरसागर दुरच आहेत. त्यामुळे संधी मिळताच त्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेच तक्रार केली. (Cm Uddhav Thackeray) मराठा आरक्षण नक्कीच द्यायला हवे, परंतु ओबीसींच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागू नये, अशी मागणीही त्यांनी केली.

मराठवाड्यासाठी १५२ टीएमसी पाणी मिळावे. मराठवाड्याचा सिंचनाचा अनुशेष भरून काढण्याच्या दृष्टीने पावले उचलावीत. हा प्रकल्प मराठवाड्याचे भाग्य बदलू शकतो. संथगतीने सुरु असलेल्या कामाला गती द्यावी. जिल्ह्यात १६०० कोटींचा खरीप पिक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट असून आतापर्यंत केवळ ९४ कोटी रुपयांचे वाटप झाले आहे. याबाबत बँकांना स्पष्ट सूचना द्याव्यात, विकास कामासाठी आलेला निधी थेट गावापर्यंत जात नसल्याचेही त्यांनी नमूद केले.

पंढरपूरच्या आषाढी यात्रेसाठी जिल्ह्यातील श्रीक्षेत्र गहिनीनाथगडाच्या पालखली सोहळ्याला मर्यादित वारकऱ्यांना परवानगी द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. महावितरण कंपनीकडून बीड नगरपालिकेला वेठीस धरण्याचा प्रयत्न होत आहे. पथदिव्यांचे वीज देयक इतर शहरांपेक्षा चार पट आकारले जाते. शहरात अमृत अटल आणि भुयारी गटार योजनेचा निधी वेळेवर मिळत नसल्याने काम संथगतीने सुरु असल्याचेही त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगीतले.

Edited By : Jagdish Pansare
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com