माजी असूनही राहुल मोटेंच्या शब्दाला मंत्रालयात वजन

पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली २१ एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत चांदणी मध्यम प्रकल्पात पाणी सोडण्याचे आदेश देण्यात आल्यानंतर जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे यानी उजनी कालवा सोलापुर येथील अधिक्षक अभियंता यांना तत्काळ पाणी सोडण्याबाबत खरीप हंगाम पुर्व तयारी बैठकीमध्ये कार्यवाही करण्याच्या सुचना केल्या आहेत.
rahul mote-tanaji  awant news
rahul mote-tanaji awant news

उस्मानाबादः विधानसभा निवडणुकीत भूम-परांडा मतदार संघातून पराभव झाला असला तरी माजी आमदार राहुल मोटे हताश झाले नाहीत. सुदैवाने राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस महाविकास आघाडीचे सरकार आले, आणि मोटे माजी आमदार असूनही त्यांच्या शब्दाला मंत्रालयात वजन असल्याचे दिसून आले. बार्शी उपसासिंचन योजनेच्या कालव्या अंतर्गत परंडा तालुक्यातील चांदणी प्रकल्पात पाणी सोडण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. या शिवाय मतदारसंघातील इतर प्रश्नाचा पाठपुरावा करत ते मार्गी लावण्यातही मोटे यांनी आघाडी घेतली आहे. सरकारमधील राष्ट्रवादीच्या मंत्र्यांकडून देखील त्यांना बळ दिले जात असल्याची चर्चा या निमित्ताने होत आहे.

महाविकास आघाडीतील मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेचे विद्यमान आमदार प्रा.तानाजी सावंत असतांना मोटे यांनी मतदारसंघातील विविध प्रश्नांसाठी पुढाकार घेत सरकारकडे पाठपुरावा करून ते मार्गी लावण्यात यश मिळवले आहे. बार्शी उपसासिंचन योजनेच्या कालवा अंतर्गत परंडा तालुक्यातील चांदणी मध्यम प्रकल्पात पाणी सोडण्यासाठी नियोजन करुन पाणी वितरणनलिका (चिमणी) बसविण्यासाठी परवानगी, तसेच दुष्काळी भागास पाणी उपलब्ध करुन देण्याची सूचना नुकतीच मोटे यांनी जिल्हाधिकारी, उजनी कालवा मंडळाचे अधिक्षक अभियंता यांना केल्या होत्या. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे देखील मोटे यांनी ही मागणी केली होती, हा संदर्भ देखील मोटे यांनी दिला. 

राहुल मोटे हे राष्ट्रवादीचे नेते असुन गेली तीन टर्म त्यानी परंडा मतदारसंघाचे नेतृत्व केलेले आहे, यंदा मात्र प्रा. तानाजी सावंत यांच्याविरोधात त्याना पराभव पत्करावा लागला. प्रा. सावंत याना मंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र त्याना मंत्रीपदाने हुलकावणी दिली. साहजिकच प्रा. सावंत यानी पक्षविरोधी भुमिका घेत आपली नाराजी स्पष्टपणे उघड केली होती. मातोश्री व प्रा.सावंत यांचे सलोख्याचे असणाऱ्या संबंधामध्ये त्यामुळे आता अंतर पडल्याचेही बोलले जाते. पण त्याचवेळी माजी आमदार राहुल मोटे यांना राष्ट्रवादीच्या नेतृत्वाकडुन बळ मिळत असल्याचे चित्र आहे. त्यांच्या अनेक मागण्याची पक्षाच्या वरिष्ट नेत्यांकडुन दखल घेऊन पुर्तता केली जात आहे.

साहजिकच मोटे यांना यातुन जो संदेश लोकांना द्यायचा होता, तो देण्यात यश मिळत आहे. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना १२ फेब्रुवारी रोजी  मोटे यांनी निवेदनातुन बार्शी उपसा सिंचन योजनेतुन अवर्षणग्रस्त भाग व परंडा तालुक्यातील चांगणी प्रकल्पात पाणी सोडण्याची मगाणी केली होती. पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली २१ एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत चांदणी मध्यम प्रकल्पात पाणी सोडण्याचे आदेश देण्यात आल्यानंतर जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे यानी उजनी कालवा सोलापुर येथील अधिक्षक अभियंता यांना तत्काळ पाणी सोडण्याबाबत खरीप हंगाम पुर्व तयारी बैठकीमध्ये कार्यवाही करण्याच्या सुचना केल्या आहेत. त्यामुळे मतदारसंघातून विद्यमान आमदार गायब तर माजी आमदारांचे मंत्रालयात वजन वाढल्याची चर्चा आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com