चेन्नईच्या `त्या` कंपनीचा देशमुख, पाटील, परिचारक यांच्याही कारखान्यांना गंडा..

लातूर जिल्ह्यातील या दोन्ही कारखान्यांनी सुद्धा पोलिसात धाव घेतली आहे.
Latur District Sugar Factory News Nanded
Latur District Sugar Factory News Nanded

नांदेडः चेन्नई येथील कुरुंजी प्रो नॅचरल फुड्स प्रा.लि. कंपनीने केवळ भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्यालाच नव्हे तर वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, अहमदपूरचे आमदार बाबासाहेब पाटील, विधान परिषदेचे आमदार प्रशांत परिचारक यांच्याही साखर कारखान्यांना गंडा घातल्याचे समोर आले आहे.(Deshmukh, Patil's and Paricharak's factories of Chennai's company were also robbed.)

या कंपनीने नांदेड जिल्ह्यातील देगाव-येळेगाव येथील भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याची साखर निर्यातीसाठी खरेदी केली होती. (Minister Amit Deshmukh Latur) साखरेच्या या साठ्याची त्यांनी उचलही केली परंतु, कारखान्याने वारंवार संपर्क साधल्यानंतरही या कंपनीने निर्यातीचे पुरावे सादर केले नाहीत.

सरतेशेवटी कारखान्याने पोलिसांत तक्रार दाखल केली व चौकशीअंती कंपनीचे चेअरमन इंदिगा मणीकांता उर्फ मुनीकृष्ण, व्यवस्थापकीय संचालक प्रदीप राज आणि मध्यस्थ अभिजीत वसंतराव देशमुख यांना अटक करण्यात आलीआहे. (Ncp Mla Babasaheb Patil, Ahmadpur,Latur)  

दरम्यान, चेन्नईच्या कुरुंजी प्रो नॅचरल फुड्स प्रा.लि. या कंपनीने अमित देशमुख यांचा निवळी, ता.जि. लातूर येथील विलास सहकारी साखर कारखाना, अहमदपूरचे राष्ट्रवादीचे आमदार बाबासाहेब पाटील यांचा खासगी साखर कारखाना सिद्धी शुगर अॅंड अलाईड इंडस्ट्रीजलाही गंडा घातल्याचे समोर आले आहे.

भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याने सदरहू कंपनीविरूद्ध पोलिसांत तक्रार केल्यानंतर लातूर जिल्ह्यातील या दोन्ही कारखान्यांनी सुद्धा पोलिसात धाव घेतली आहे. भाजपचे विधान परिषद सदस्य प्रशांत परिचारक यांच्या पांडुरंग सहकारी साखर कारखाना, श्रीपूर, जि. सोलापूर या कारखान्यालाही सदरहू कंपनीने आर्थिक फटका दिल्याची माहिती आहे.

Edited By : Jagdish Pansare
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com