मला वेडं ठरवू पाहणारे दानवे-खैरे दहापट वेडे

हो मी निराशेच्या गर्तेत होतो, आत्म्हत्यचे विचार देखील माझ्या मनात आले होते. पण मला लोकांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून खूप पाठिंबा दिला, त्यामुळे मी आता या सगळ्यातून बाहेर पडलो आहे. अजूनही माझी वाद मिटवण्याची तयारी आहे, पण तुम्हाला नको असेल तर ‘ मै ने भी अभी सरपे कफन बांध लिया है‘.
harshvardhan jadhav attack on khaire-danve news
harshvardhan jadhav attack on khaire-danve news

औरंगाबादः माझे सासरे केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे चंद्रकांत खैरे हो दोघेही मला वेडं ठरवू पाहत आहेत. मला अशा माहिती मिळाली आहे, की हे दोघे वेगवेगळ्या डॉक्टरांना भेटून मी वेडा असल्याचे प्रमाणपत्र मिळवू पाहत आहेत. पण ते त्यांना मिळणार नाही, कारण मी वेडा नाहीये. उलट कोरोनाच्या संकटात लोकांना अन्न मिळत नाहीये, त्यावर लक्ष केंद्रीत करायचे सोडून मला वेड ठरवण्यात हे दोघे दिवसांतले अठरा तास घालवत आहेत. त्यामुळे मला वेडं ठरवणारे दानवे-खैरे हेच दहापट वेडे आहेत, असा गंभीर आरोप माजी आमदार तथा रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांनी केला.

एक नवा व्हिडिओ जारी करत जाधव यांनी ‘ मै ने भी सरपर कफन बांध लिया है‘, असे म्हणत मी घाबरणार नाही, स्वाभीमानाची लढाई लढणार असे आव्हान दानवे यांना दिले आहे.

हर्षवर्धन जाधव यांनी यापुर्वी सोशल मिडियावर दोन व्हिडिओ प्रसिध्द करत आपल्या घरातील वैयक्तिक भांडण चव्हाट्यावर आणले होते. रावसाहेब दानवे यांच्यावर गंभीर आरोप करत ते आपला छळ करत असल्याचे सांगत जाधव यांनी आत्महत्येची धमकी देत खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर पुन्हा एकदा व्हिडिओच्या माध्यमातून जाधव यांनी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि रावसाहेब दानवे यांच्यावर निशाणा साधला आहे.

सात मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये दानवे-खैरेंवर टिका करतांना हर्षवर्धन जाधव म्हणाले, मी वेडा नाहीये, पण माझे सासरे आणि शिवसेनेचे खैरे मला वेडं ठरवू पाहत आहेत. तसे प्रयत्न त्यांनी चालवले आहेत. पण केंद्रीय मंत्री असतांना, देशावर, राज्यावर कोरोनाचे संकट ओढावलेले असतांना आपली संगळी काम सोडून जो माणूस मला वेडं ठरवण्यासाठी दिवस खर्ची घालतो, तो खरा वेडा.

कोरोनाच्या संकटामुळे मजूर, कामगारा अन्नधान्याशिवाय उपाशी मरत आहे, त्याकडे लक्ष न देता माझे सासरे मला वेड ठरवण्यात वेळ घालवत आहे, यारून कोण वेड हे लक्षात येते. मला वेडं ठरवून तुमच्यावरचे आरोप सिध्द होणार नाहीत, असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्हीच खरे वेडे आहात.

घरातील वाद चव्हाट्यावर आणले तुम्ही आणि त्याचे खापर माझ्यावर फोडले, त्यातून चार भिंतीच्या आता बसून मार्ग काढण्याऐवजी तुम्ही मला वेड ठरवायला निघालात, यातच सगळे आले.  वादावर मार्ग काढायची इच्छा असेल तर अजूनही माझी तयारी आहे, पण यांच आपल भलंतच चाललयं. माझी पुन्हा एकदा दानवेंना हात जोडून विनंती आहे, तुम्ही जगा आणि मलाही जगू द्या.

पहाटे शपथ घणारे वेडे असतात..

हर्षवर्धन जाधव यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून शिवसेना, राष्ट्रवादी व भाजपवर देखील टिका करत त्यांच्या नेत्यांना वेडं ठरलवलं आहे. पहाटे गुपचूप शपथ घेणारे वेडे असतात, ज्या राष्ट्रवादीला शिव्या घातल्या त्यांच्या बरोबरच सत्ता स्थापन करता. ज्या अजित पवारांना जेलमध्ये टाकण्याची भाषा केली, त्यांना उपमुख्यमंत्री करता हे काय शहाणपणाचं लक्षण आहे का? तुमचा पक्ष आणि नेतेच वेडे आहेत.

आता जेव्हा राष्ट्रवादीने कॉंग्रेस सोबत सत्ता स्थापन केली, तर पुन्हा अजित पवारांना अटक करा, दिल्लीची समिती बोलवा अशी भूमिका भाजपचे नेते घेत आहेत, त्याला वेडेपणा म्हणतात. शिवसेनाही काही कमी नाही त्यांनी देखील ज्या कॉंग्रेस-राष्ट्रवादीला आयुष्यभर शिव्या घातल्या त्यांच्याबरोबरच सत्ते जाऊन बसली. त्यामुळे मुंबईत बसलेले सगळे वेडे आहेत, अशी टिकाही जाधव यांनी केली आहे.

शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांच्याबद्दल तर बोलायलाच नको, त्यांनी तर कोरोना घालवण्यासाठी महामृत्यूंजय जप करा असे सांगितले. असे असेल तर तुम्ही उद्धव ठाकरेंना सांगा ना, त्यांना पटले तर ते निर्णय घेतली. त्यामुळे बिचाऱ्या डॉक्टर, नर्स आणि रस्त्यावर उभे राहून ड्युटी करणाऱ्या पोलिसांवरचा ताण तरी कमी होईल, असा टोला जाधव यांनी लगावला.

मला वेड ठरवण्याचा प्रयत्न करून, तुमचा वेडेपणा लोकांसमोर आणू नका, असे सुनावतानाच मी कुणाला घाबरणार नाही, हो मी निराशेच्या गर्तेत होतो, आत्म्हत्यचे विचार देखील माझ्या मनात आले होते. पण मला लोकांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून खूप पाठिंबा दिला, त्यामुळे मी आता या सगळ्यातून बाहेर पडलो आहे. अजूनही माझी वाद मिटवण्याची तयारी आहे, पण तुम्हाला नको असेल तर ‘ मै ने भी अभी सरपे कफन बांध लिया है‘, मी देखील मेल्या आईचे दुध पिलेले नाही, स्वाभीमानाची लढाई लढणार असा इशाराही जाधव यांनी शेवटी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com