लातूर ः एका महिलेला तिच्या वडिलांच्या जागी अनुकंपातत्त्वावर नोकरी देण्याच्या कारणावरून शरीर सुखाची मागणी केल्याप्रकरणी जिल्हा परिषदेlतील समाजकल्याण अधिकाऱ्याच्या विरोधात विनयभंग आणि ॲट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नाेंद करण्यात आल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक जितेंद्र जगदाळे यांनी दिली आहे.
अनुंकपा तत्वावर वडिलांच्या जागी नोकरी देण्यासाठी समाज कल्याण अधिकाऱ्यांने संबंधित महिलेकडे शरीर सुखाची मागणी करत तिचा विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार आज उघडकी आला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास वरिष्ठ पोलिस अधिकारी करत आहेत.
पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, तिचे वडील शासकीय सेवेत होते. काही वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले. त्यांच्या जागी अनुकंपातत्त्वावर नोकरी मिळावी म्हणून पीडिताने अर्ज केला होता. प्रतीक्षा यादीतही तिचे नाव होते. आपल्याला नियुक्ती द्यावी म्हणून ती जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागात चकरा मारत होती.
पद रिक्त असूनही जिल्हा समाजकल्याण अधिकारी सुनील खमितकर यांनी टाळाटाळ करून पैशाची मागणी केली होती. पैसे नसल्याने खामितकर याने २२ जानेवारीला सदर महिलेकडे शरीर सुखाची मागणी केली, असा आरोप पीडितेने केला. त्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Edited By : Jagdish Pansare
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.