अंबाजोगाईतील त्या सहा रुग्णांचा मृत्यू ऑक्सीजन बंद झाल्याने? चौकशीची मागणी

रुग्णालयात भरती होतानाच त्यांच्या शरीरातील ऑक्सीजनचे प्रमाण कमी झालेले रुग्ण होते, अशी माहिती स्वारातीचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी दिली.
Bjp Mla Nmita Mundada- Ambajogai Medical Hospital News Beed
Bjp Mla Nmita Mundada- Ambajogai Medical Hospital News Beed

अंबाजोगाई : स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सहा कोरोना रुग्णांचा ऑक्सीजन बंद केल्याने मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. रुग्णालय प्रशासनाने मात्र हे आरोप फेटाळले असून या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी भाजपच्या आमदार नमिता मुंदडा यांनी केली आहे.

नाशिकच्या झाकीर हुसेन हाॅस्पीटलमध्ये आॅक्सीजन गळती होऊन २२ रुग्णांचे प्राण गेल्याची दुर्दैवी घटना ताजी असतांनाच अंबाजोगाईत देखील असाच प्रकार घडला की काय? याची चर्चा होती. नातेवाईकांच्या आरोपामुळे सहा रुग्णांचा मृत्यू आॅक्सिजन अभावीच झाला की काय? यावरून संशयाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र रुग्णालाय प्रशासनाने हे आरोप फेटाळून लावले आहेत.

स्वामी रामांनद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात मंगळवार मध्यरात्रीपासून बुधवारी दुपारी १२ वाजेपर्यंत तब्बल ११ मृत्यू झाले. स्वाराती प्रशासनानेच  ही माहिती दिली. दरम्यान, तासभरात झालेले सहा मृत्यू ऑक्सीजनअभावी झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

रुग्णालय प्रशासनाने मात्र हे आरोप फेटाळले आहेत. या संशयाच्या वातावरणामुळे या प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करावी आणि रुग्णांच्या नातेवाईकांना नाशिकच्या घटनेप्रमाणे प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी नमिता मुंदडा यांनी केली आहे. 

अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अर्धा तास ऑक्सीजन पुरवठा बंद होता. या दरम्यानच सहा रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला. यावर आमदार नमिता मुंदडा यांनी या प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली.

तर दुसरीकडे रुग्णालय प्रशासनाने मृतांच्या नातेवाईकांचे आरोप फेटाळत मृत्यू झालेले बहुतांशी ६० वर्षांवरील, उच्चरक्तदाब, साखर अशा आजारांचे आणि रुग्णालयात भरती होतानाच त्यांच्या शरीरातील ऑक्सीजनचे प्रमाण कमी झालेले रुग्ण होते, अशी माहिती स्वारातीचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी दिली. ऑक्सीजन उपलब्धतेसाठी रुग्णालय सर्वतोपरी प्रयत्न करत असून ऑक्सीजन साठा सध्या पुरेसा असल्याचेही त्यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

Edited By : Jagdis Pansare
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com