`त्या` सलून चालकाचा मृत्यू चक्कर आल्याने? सीसीटीव्ही फुटेजमुळे गुढ वाढले . - The death of the salon owner due to dizziness? CCTV footage came next | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

इंदापूरला उजनीतून पाणी देण्याचा निर्णय रद्द : जयंत पाटील यांची घोषणा
मंत्रीमंडळाच्या उपसमितीच्या बैठकीसाठी महाविकास आघाडीतील प्रमुख नेते सह्याद्रीवर दाखल. एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आणि मुख्य सचिव सिताराम कुंटे हेही उपस्थित आहेत.
मराठा आरक्षणासाठीची भाजपची महत्वाची बैठक आज विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी होत आहे. यासाठी रविंद्र चव्हाण, चंद्रकांत पाटील, गिरीश बापट, प्रवीण दरेकर उपस्थित आहेत.

`त्या` सलून चालकाचा मृत्यू चक्कर आल्याने? सीसीटीव्ही फुटेजमुळे गुढ वाढले .

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 15 एप्रिल 2021

आता फिरोज याला पोलिसांकडून मारहाण झाली होती का? की चक्कर येऊन डोक्याला इजा झाली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला याचे गुढ वाढले आहे.

औरंगाबाद ः कोरोना पार्श्वभूमीवर शहर व जिल्ह्यात दुकाने बंद असतांना उस्मानपुरा भागात एका सलून चालकाने दुकान सुरू ठेवले होते. पोलिसांना कारवाई केली असता त्याचा मृत्यू झाला, पण पोलिसांनी मारहाण केल्यामुळेच फिरोज दगावला असा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला होता. या प्रकरणात काही पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची तात्काळ बदली देखील करण्यात आले. परंतु या प्रकरणात आज नवी माहिती समोर आली आहे.

 एका सीसीटीव्ही फुटेजनूसार फिरोज याचा मृत्यू चक्कर येऊन झाल्याचा दावा केला जात आहे.  ब्रेक द चेन अंतर्गत शहरात निर्बंध लागू आहेत. असे असतांना उस्मानपूरा भागातील एक सलून सुरू असल्यामुळे पोलिसांनी फेरोज खान कदीर खान याच्यावर कारवाई केली. परंतु पोलीस स्टेशनमध्ये नेत असतांनाच सलून चालकाचा मृत्यू झाला. दरम्यान, पोलिसांच्या मारहाणीतच सलून चालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी फिरोजचा मृतदेह पोलिस ठाण्यात नेला होता.

संबंधित पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका नातेवाईकांनी घेत उस्मानपूरा पोलिस ठाण्यासमोर गर्दी केली होती. ऐन रमझानच्या पहिल्याच दिवशी हा प्रकार घडल्याने या भागात तणावाचे वातावरण होते.

फिरोजच्या नातेवाईकांसह या भागातील नागरिकांनी उस्मानपुरा पोलिस ठाण्यासमोर काल मोठी गर्दी केली होती. पोलिसांनी केलेल्या मारहाणीमध्येच फिरोज खान, कदीर खानचा मृत्यू झाला असून संबंधित पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी आक्रमक भूमिका जमावाने घेतली होती.

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनीही पोलीस स्टेशनमध्ये धाव घेऊन पोलिस आयुक्तांशी संपर्क साधून या प्रकरणातील दोषी पोलिस अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानूसार तातडीने कारवाई देखील करण्यात आली. मात्र आज या प्रकरणात घटनास्थळावरील एक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.

यामध्ये पोलिस फिरोज याच्याशी चर्चा करत असतांनाच तो चक्कर येऊन खाली कोसळला होता. तेव्हा पोलिस व आसपासच्या लोकांनी फिरोज याला उचलून रुग्णालयात दाखल केले होते. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये फिरोज याच्या डोक्याला मार लागल्याने मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता फिरोज याला पोलिसांकडून मारहाण झाली होती का? की चक्कर येऊन डोक्याला इजा झाली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला याचे गुढ वाढले आहे.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख