दुध संघाने नफेखोरी सोडून शेतकऱ्यांना दरवाढ द्यावी..

आज शेतकऱ्यांकडून २० रुपयाने दुध खरेदी केल्यानंतरही दुप्पट दाराने ते पॅक करून विकले जात आहे. मग दुध संघाला दुप्पट नफा कशासाठी हवा आहे, ते का शेतकऱ्यांच्या दुधाला १० रुपये दरवाढ देत नाहीत. नफेखोरी करायची आणि सरकारच्या नावाने ओरड करायची याचा अर्थ भाव देण्यात अपयशी ठरलेल्या दुध संघ व चेअरमन यांनी याचे खापर सरकारच्या माथी फोडण्याचा हा प्रकार आहे.
kalyan kale target mla haribhu bagde on milk issu news
kalyan kale target mla haribhu bagde on milk issu news

औरंगाबाद ः शेतकऱ्यांचे दूध कमी भावाने खरेदी करायचे आणि दुप्पट नफा कमावयाचा हे धोरण दुध संघ राबवत असेल आणि वर पुन्हा दरवाढीसाठी आंदोलन करत चेअरमनच रस्त्यावर उतरत असेल तर याला मराठीत ‘चोराच्या उलट्या बोंबा‘, असे म्हणतात असा टोला कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांनी भाजपचे आमदार तथा जिल्हा दुध संघाचे चेअरमन हरिभाऊ बागडे यांना लगावला आहे. नफेखोरी बंद करा आणि शेतकऱ्यांच्या दुधाला दहा रुपये वाढवून द्या, असे आवाहनही काळे यांनी केले.

भाजप व विविध शेतकरी संघटनांच्या वतीने १ आॅगस्ट रोजी राज्यभरात शेतकऱ्यांच्या दुधाला प्रतिलिटर १० रुपये दरवाढ तसेच दुध भुक्टीला ५० रुपयांचा भाव द्या, यासाठी आंदोलन करण्यात आले होते. हे आंदोलन म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असल्याची टिका करत कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याण काळे यांनी जिल्हा दुध संघाच्या नफेखोरीबद्दल प्रश्न उपस्थित केला.

पत्रकारांशी बोलतांना कल्याण काळे म्हणाले, दुधाला दरवाढ देण्याची जबाबदारी ही सरकारची नाही, तर दूध खरेदी करणाऱ्या जिल्हा दुध संघाची आहे. कारण शेतकऱ्यांचे दूध खरेदी करून, त्यावर प्रक्रिया केल्यानंतर ते पॅक करून विकण्याचे काम दुध संघच करत असते, सरकार थेट कधीच दुध खरेदी करत नसते.

औरंगाबाद जिल्हा दुध संघ जेव्हा ३१ रुपये दराने शेतकऱ्यांकडून दुध खरेदी करत होते, तेव्हा त्याच्यावर प्रक्रिया करून ४० रुपये लिटर दराने विकायचे. आज शेतकऱ्यांकडून २० रुपयाने दुध खरेदी केल्यानंतरही दुप्पट दाराने ते पॅक करून विकले जात आहे. मग दुध संघाला दुप्पट नफा कशासाठी हवा आहे, ते का शेतकऱ्यांच्या दुधाला १० रुपये दरवाढ देत नाहीत. नफेखोरी करायची आणि सरकारच्या नावाने ओरड करायची याचा अर्थ भाव देण्यात अपयशी ठरलेल्या दुध संघ व चेअरमन यांनी याचे खापर सरकारच्या माथी फोडण्याचा हा प्रकार आहे.

केंद्राकडून अडवणूक..

शेतकऱ्यांच्या दुधाला व दुध भुक्टीला चांगला भाव मिळावा यासाठी राज्य सरकारने केंद्राकडे मागणी केली. पण केंद्रातील भाजप सरकारने राज्याकडे पडून असलेल्या दुध भुक्टीच्या निर्यातीवर बंदी घातली. एवढेच नाही तर राज्यात पाच वर्ष पुरेल एवढी दुध भुक्टी असतांना न्यूझीलंडकडून २५ हजार मेट्रीक टन दुध भुक्टीची आयात केली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या दुधाचे भाव पडले. राज्य सरकाने जिल्हा दुध संघाला ३५ हजार लिटर दुधाचा कोटा वाढवून देत दुध खरेदीची तयारी दर्शवली, पण यांना ते ही पुरवता आले नाही, असा आरोपही काळे यांनी यावेळी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com