Congress Minister Balasaheb Thorat News Aurangabad
Congress Minister Balasaheb Thorat News Aurangabad

काॅंग्रेस नेत्यांच्या औरंगाबादेत चकरा वाढल्या; थोरात पदाधिकाऱ्यांशी साधणार संवाद..

नाना पटोले यांनी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर पक्षात एक नवी उर्जा निर्माण झाल्याचे चित्र आहे.

औरंगाबाद ः कधीकाळी जिल्ह्यात खासदार, आमदार, स्थानिक स्वराज्य संस्थावर मजुबत पकड असलेली काॅंग्रेस सध्या जिल्ह्यात अस्तित्वासाठी धडपडते आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकी काॅंग्रेसची मोठी नाच्चकी झाली, लोकसभेत उमेदवाराचे डिपाॅझीट जप्त झाले, तर विधानसभेत पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही. (The cycle of Congress leaders in Aurangabad increased; Thorat will interact with office bearers) दरम्यान, राज्यातील नेतृत्वाने जिल्ह्याकडे दुर्लक्ष केल्यामुळेच हे दिवस आल्याचे आरोप जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी केले होते.

परंतु राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर व कोरोना आणि सुरुवातीचा खडतर काळ संपल्यानंतर आता काॅंग्रेसच्या नेत्यांनी औरंगाबाद जिल्ह्यावर आपले लक्ष पुन्हा केंद्रित केले आहे. (Minister Amit Deshmukh, Maharashtra) संपर्क मंत्री अमित देशमुख, उर्जामंत्री नितीन राऊत, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या आता जिल्ह्यात चकरा सुरू झाल्या आहे. आगामी महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काॅंग्रेसने पुन्हा एकदा पक्ष बांधणीवर जोर दिला आहे.

या शिवाय मुंबईत देखील दर महिन्याला जिल्ह्यातील महत्वाच्या पदाधिकाऱ्यांना बोलवून आढावा घेतला जात आहे. (Minsiter Balasaheb Thorat Maharashtra) बाळासाहेब थोरात हे उद्या औरंगाबादेत येणार आहेत. यावेळी ते गांधी भवन येथी पक्ष कार्यालयात पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांची संवाद साधणार आहेत. राज्याचे सत्तेत सहभागी असलेल्या काॅंग्रेसने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये स्वबळाचा नारा दिला आहे.

नाना पटोले यांनी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर पक्षात एक नवी उर्जा निर्माण झाल्याचे चित्र आहे. चर्चेत नसलेल्या काॅंग्रेसची आता राज्यभरात चर्चा सुरू आहे.  स्वबळाचा नारा दिल्यानंतर आणि आगामीकाळात होणाऱ्या निवडणुका लक्षात घेता काॅंग्रेस नेत्यांनी औरंगाबादवर लक्ष केंद्रित केले आहे. अमित देशमुख यांची संपर्कमंत्री म्हणून नेमणूक केल्यानंतर त्यांनी देखील आतापर्यंत दोन ते तीनवेळा जिल्ह्याचा दौरा करून पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले आहे.

महापालिका निवडणुकीत स्वबळ?

औरंगाबाद महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचा नारा सर्वप्रथम त्यांनीच औरंगाबादेत दिला होता. त्यानंतर राज्याचे उर्जा मंत्री नितिन राऊत यांनी देखील महापालिका निवडणुकीसाठी हवी ती मदत करण्याची तयारी दर्शवत काॅंग्रेस कार्यकर्त्यांना सूचक संदेश दिला होता. काॅंग्रेचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार डाॅ. कल्याण काळे, शहराध्यक्ष उस्मानी या नव्या नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात काॅंग्रेस नव्याने उभारी घेण्याचा प्रयत्न करत आहे.

स्थानिक पदाधिकाऱ्यांची टीका आणि नाराजीनंतर राज्यातील नेत्यांनी देखील औरंगाबादला वेळ देण्यास सुरूवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून महसुल मंत्री बाळासाहेब थोरात उद्या, औरंगाबाद दौऱ्यावर येत आहेत. महसुल विभागाची आढावा बैठक घेतल्यानंतर ते शहर आणि ग्रामीण अशा दोन्ही पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहे. नेत्यांचा जिल्ह्यातील वाढता वावर काॅंग्रेस कार्यकर्त्यांना बळ देणारा ठरेल असे बोलले जाते.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com