पहाटे नळ कट, दुपारी मनसे पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल.. - Cut the tap in the morning, file a case against MNS office bearers in the afternoon. | Politics Marathi News - Sarkarnama

पहाटे नळ कट, दुपारी मनसे पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल..

सरकारनामा ब्युरो
रविवार, 18 जुलै 2021

महापालिकेला हा प्रकार कळताच संबंधितांविरोधात सिटीचौक पोलिस ठाण्यात दुपारी तक्रार देण्यात आली.

औरंगाबाद ः भल्या पहाटे महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांच्या घराचे नळ कनेक्शन कट करणे मनसे पदाधिकाऱ्यांच्या आता अंगलट आले आहे. (Cut the tap in the morning, file a case against MNS office bearers in the afternoon.) या प्रकरणी आता महापालिकेच्या तक्रारीनंतर सिटीचौक पोलिसांनी सात मनसे पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.

शहरवासियांना दोन दिवसाआड पाणी पुरवठा करा, अन्यथा महापालिका आयुक्तांच्या घराचे नळ कनेक्शन कट करू, असा इशारा मनसेच्या वतीने ७ जुलै रोजी देण्यात आला होता. (Municipal Commissinor Astikkumar pandey Aurangabad) याकडे दुर्लक्ष केल्यामुळे रविवारी पहाटे मनसेच्या सात-आठ पदाधिकाऱ्यांनी दिल्लीगेट येथील मनपा आयुक्ताच्या बंगल्यात जाणारे नळ कनेक्शन कट केले होते.

या प्रकरणी आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बिपिन नाईक, वैभव मिटकर, संकेत शेटे, राहुल पाटील, प्रशांत दहिवाडकर, मनीष जोगदंडे यांच्यासह अन्य एकजण अशा सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (fir filed Against Mns Activits)  सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओच्या आधारे पाणीपुरवठा विभागाने सिटीचौक पोलीस ठाण्यात संबंधितावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.

गेल्या आठवड्या मनसेच्या वतीने महापालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांना शहरातील पाणी पुरवठ्या संदर्भात निवदेन देण्यात आले होते. पालकमंत्री सुभाष देसाई यांनी शहराला दोन दिवसआड पाणी पुरठ्याचे नियोजन करण्याचे आदेश महापालिकेला दिले होते.

त्यानंतर मनसेने देखील या विषयी आक्रमक भूमिका घेत आठवडाभरात दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला नाही, तर आयुक्तांच्या बंगल्याचे नळ कनेक्शन कट करू असा, इशारा दिला होता. पंरतु मनसेच्या या निवेदनाची महापालिका आयुक्तांनी दखल घेतली नाही.

शेवटी मनसेने आज गनिमीकावा करत भल्या पहाटे आयुक्तांच्या बंगल्याचे नळ कनेक्शन कट करत दणका दिला. मनसेच्या या अनोख्या आंदोलनाची जोरदार चर्चा झाली. परंतु महापालिकेला हा प्रकार कळताच संबंधितांविरोधात सिटीचौक पोलिस ठाण्यात दुपारी तक्रार देण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केले.

हे ही वाचा ः पवार कुटुंबाचे प्रत्येक राजकीय पक्ष, नेत्यांशी उत्तम संबंध..

Edited By : Jagdish Pansare
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख