आधी पालकमंत्र्यावर टिका, आता एकत्रित काम करण्यासाठी विनंती पत्र..

लोकांमध्ये भितीचे वातवरण असून पालकमंत्री अमित देशमुख यांनी या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधी व प्रशासन यांची एक संयुक्त आढावा बैठक बोलवावी, अशी विनंती निलंगेकरांनी पत्राद्वारे केली आहे. कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाय योजना आणि घ्यावयाची काळजी यावर एकत्रितपणे विचारविनिमय होणे गरजेचे आहे.
nilangekal letter to amit deshmukh news
nilangekal letter to amit deshmukh news

निलंगाः लातूर शहर व जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना बाधितांची जिल्ह्यातील संख्या तीनशेहून अधिक झाली आहे, तर पाचहून अधिक जणांचा या महामारीने मृत्यू झालेला आहे. अशा परिस्थितीत प्रशासन, आरोग्य यंत्रणा चांगले नियोजन करत आहेत, पण जिल्ह्याचे पालकमंत्री कुठेच दिसले नाही, अशी टिका माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी अमित देशमुख यांच्यावर काही दिवसांपुर्वी केली होती. आता त्याच पालकमंत्र्यांना कोरोनाचा लढा एकत्रितपणे लढू असे म्हणत, सर्व लोकप्रतिनिधींची एक आढावा बैठक घ्या, अशी मागणी करणारे विनंती पत्र निलंगेकरांनी पाठवले आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या संकटाच्या काळात डॉक्टर, कर्मचारी, पोलीस, प्रशासनातील अधिकारी ही परिस्थिती हाताळण्यासाठी अत्यंत चांगले नियोजन करत आहेत. पण जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख मात्र कुठेच दिसले नाही. रस्त्यावर फिरतांनाही ते दिसले नाहीत, ते घरातच बसून आहेत, अशी टिका आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी काही दिवसांपुर्वी केली होती. त्यानंतर राजकीय वर्तुळात याची मोठी चर्चा देखील झाली.

दरम्यान, कोरोना रुग्णांची संख्या आणि मृतांचे वाढते प्रमाण लातूरकरांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. लोकांमध्ये भितीचे वातवरण असून पालकमंत्री अमित देशमुख यांनी या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधी व प्रशासन यांची एक संयुक्त आढावा बैठक बोलवावी, अशी विनंती निलंगेकरांनी पत्राद्वारे केली आहे. कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाय योजना आणि घ्यावयाची काळजी यावर एकत्रितपणे विचारविनिमय होणे गरजेचे आहे.

लातूर जनतेच्या हितासाठी सर्वजण एकत्रितपणे येवून सर्वोत्तपरी प्रयत्न करावे, असे आम्हाला वाटते. कोरोनाच्या संकटात या रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सर्वजण कसलेही मतभेद न करता समन्वयाने आपल्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व प्रशासनाची एकत्रित आढावा बैठक घ्यावी, जेणेकरून आपल्याला कोरोनाच्या संकटावर मात करता येईल, असेही निलंगेकरांनी अमित देशमुखांना पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे. आता निलंगेकरांच्या या प्रस्तावाला पालकमंत्री कसे प्रतिसाद देतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Edited By: Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com