शिवसेना खासदार, आमदारासह कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी खासदार संजय जाधव, आमदार डॉ.राहूल पाटील, जिल्हाप्रमुख विशाल कदम, पंढरीनाथ घुले, अतुल सरोदे, नंदू पाटील, अनिल डहाळे, युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष अर्जुन सामाले, नवनित पाचपोर यांच्यासह इतरांविरूध्द नवा मोंढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
mp mla file fir news
mp mla file fir news

परभणी : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात अनाधिकृतपणे राजकीय कार्यकर्ते एकत्र जमवून घोषणाबाजी केल्या प्रकरणी परभणीचे शिवसेना खासदार संजय जाधव, आमदार डॉ. राहूल पाटील यांच्यासह भाजप व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर नवामोंढा पोलिस ठाण्यात गुरुवारी (ता.२४) रात्री गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी २२ जुलै रोजी राज्यसभेत पार पडली. उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी या सदस्यांना पद व गोपनियतेची शपथ दिली. दरम्यान, भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी शपथ घेतल्यानंतर जय भवानी, जय शिवाजी असा उल्लेख केला.

यावर सभापती नायडू यांनी नाराजी व्यक्त करत उदयनराजे यांना समज दिली, तसेच शपथेतील मजकुरा व्यतिरिक्त त्यांनी केलेला जय भवानी, जय शिवाजी हा उल्लेख कामकाजातून काढून टाकण्यात येत असल्याचे सांगितले. त्यानंतर राज्यभरात नायडू  यांच्या विरोधात संतापाची लाट उसळली होती.

छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याचा आरोप करत शिवसेनेने राज्यभरात आंदोलन छेडत या प्रकाराचा निषेध नोंदवला होता. परभणीत शिवसेना खासदार संजय जाधव, आमदार राहूल पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ शिवसैनिकांनी आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली होती. कोरोना विषाणु संक्रमणामुळे लोकांनी एकत्र जमू नये असे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिले आहेत.

तसेच सध्या साथरोग कायदा जिल्हाभरात लागू करण्यात आला आहे. त्यामुळे जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी खासदार संजय जाधव, आमदार डॉ.राहूल पाटील, जिल्हाप्रमुख विशाल कदम, पंढरीनाथ घुले, अतुल सरोदे, नंदू पाटील, अनिल डहाळे, युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष अर्जुन सामाले, नवनित पाचपोर यांच्यासह इतरांविरूध्द नवा मोंढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाजप पदाधिकाऱ्यांवरही गुन्हे..

शिवसेने प्रमाणेच दुध उत्पादकांना वाढीव भाव द्यावा, या मागणीसाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमवून जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर केल्या प्रकरणी भाजपचे ज्येष्ठ नेते माजी आमदार विजय गव्हाणे, महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांच्यासह अन्य पदाधिकारी- कार्यकर्त्यां विरूध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com