पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखवणाऱ्या इम्तियाज यांच्यासह एमआयएमच्या २४ जणांवर गुन्हे..

राज्याला मंजुर झालेले क्रिडा विद्यापीठ औरंगाबादला मिळाले होते. त्यासाठी दीडशे एकरपैकी १३५ एकर जागा उपलब्धही करण्यात आली.
Fir field against Mp Imtiaz Jalil And others news aurangabad
Fir field against Mp Imtiaz Jalil And others news aurangabad

औरंगाबाद ः माझे क्रिडा विद्यापीठ परत द्या, म्हणत स्वातंत्र्यदिनी पालकमंत्री सुभाष देसाई यांना काळे झेंडे दाखवणारे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील व त्यांच्या चोवीस कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.  (Crimes against 24 MIMs including Imtiaz who showed black flags to the Guardian Minister.) कोरोनाचे निर्बंध असतानाही रविवारी (ता. १५) एमआयएमने आंदोलन केल्याप्रकरणी सहाय्यक पोलिस निरिक्षक सय्यद मोहसीन अली यांच्या तक्रारीवरुन हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

इम्तियाज जलील यांच्यासह माजी नगरसेवक नासेर सिद्दीकी, शहराध्यक्ष अब्दुल समीर, आरेफ हुसैनी, शारेक नक्षबंदी, गंगाधर ढगे, अजीम खान, फेरोज खान, कुणाल खरात, अनिस खान, शेख बब्बु लिडर, सय्यद अजीम, जुबेर खान, अबरार पटेल, अबरार बागवान, अनिस लिडर, सिराज बागवान, शेख निजामोद्दीन, अब्दुल हसन हाश्मी, अजहर पठाण, शोएब खान, अजहर चाऊस, जलील पटेल, मतीन खान यांच्या विरोधात अपत्ती व्यावस्थापन कायद्याचा भंग करणे तसेच विनापरवाना आंदोलन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( ("Give back my sports university," said MIM, showing black flags to the Guardian Minister.)

राज्याला मंजुर झालेले क्रिडा विद्यापीठ औरंगाबादला मिळाले होते. त्यासाठी दीडशे एकरपैकी १३५ एकर जागा उपलब्धही करण्यात आली. (Gardiuan Minister Subhash Desai, Aurangabad)  परंतु अचनाक हे क्रिडा विद्यापीठ पुण्याच्या बालेवाडीला करण्याचा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे मराठावाडा व विशेषतः औरंगाबाद जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी,क्रिडा, सामाजिक संघटनांनी देखील हा अन्याय निूपटपणे सहन केला, असा आरोप करत एमआयएमने  स्वातंत्र्यदिनीच ` माझे क्रिडा विद्यापीठ परत द्या`, असे म्हणत विभागीय आयुक्त कार्यालयासमोर जोरदार आंदोलन केले.

मुख्यमंत्र्यांनाही दिला इशारा..

ध्वजारोहणासाठी आलेल्या पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या वाहनांच्या ताफ्याला देखील यावेळी काळे झेंडे दाखवण्यात आले होते. शिवसेनेचे नेते शहरात फक्त जनतेच्या भावना भडकवण्यासाठीच येतात, औरंगाबादचे संभाजीनगर करण्याच्या घोषणा करतात. (Mim Mp Imtiaz Jalil, Aurangabad) मराठावाड्याच्या विकासाच्या प्रश्नावर मात्र ते मूग गिळून गप्प बसतात. मराठवाड्याला मिळणाऱ्या अनेक संस्था विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात पळण्यात आल्या.

आता क्रिडा विद्यापीठ देखील इथून पुण्याला हलवण्यात आले. आता हा अन्याय आम्ही सहन करणार नाही, अशा इशारा देतांनाच यापुढील काळात क्रिडा विद्यापीठासाठीचे आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, मुख्यमंत्र्यांना देखील आम्ही याचा जाब विचारू, असेही इम्तियाज जलील यांनी सांगितले होते.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com