विनयभंग केल्याप्रकरणी सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, सदस्यांसह १६ जणांविरुध्द गुन्हा - Crime against Sarpanch, Deputy Sarpanch, Gramsevak, members and 16 others for molestation | Politics Marathi News - Sarkarnama

विनयभंग केल्याप्रकरणी सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, सदस्यांसह १६ जणांविरुध्द गुन्हा

सरकारनामा ब्युरो
रविवार, 14 मार्च 2021

घरासमोरील जागा उकरून साफसफाई करू लागले. तेव्हा पिडीत मुलीने आमची जागा का खराब करताय, तुमच्याकडे कोणाचा आदेश आहे ते मला दाखवा असे म्हणत जाब विचारला.

लातूर ः अहमदपूर तालुक्यातील कोपरा किनगाव येथे मुलीस मारहाण करून तिचा विनयभंग करण्यात आल्याप्रकरणी गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, सदस्यांसह १६ जणांविरुध्द किनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात पिडीत मुलीने तक्रार दिली होती. त्यानूसार १२ मार्च रोजी दुपारी एक ते दीडच्या दरम्यान सरपंच गंगाधर डेपे, उपसरपंच बालाजी आचार्य, ग्रामसेवक, प्रशांत आचार्य, कांचन आचार्य, राहूल कांबळे, गहिनीनाथ आचार्य, सुभाष टेलर, मैनाबाई आचार्य, मैनाबाईचा मुलगा, शिला आचार्य, संतराम ग्रामपंचायत सेवक, भुराबाई आचार्य, शांताबाई आचार्य, सुभाष टेलरची बायको, जेसीबी ऑपरेटर हे सर्वजण फिर्यादीच्या घरासमोर आले.

घरासमोरील जागा उकरून साफसफाई करू लागले. तेव्हा पिडीत मुलीने आमची जागा का खराब करताय, तुमच्याकडे कोणाचा आदेश आहे ते मला दाखवा असे म्हणत जाब विचारला. तुला कसला आदेश दाखवायचा असे म्हणून सरपंच गंगाधर डेपे यांनी तिला हातातील काठीने ढकलून दिले.

तसेच जेसीबीने देवीचे मंदिर, मुर्ती, पाटी पाडून टाकली. तर विरोध करणाऱ्फिया पिडीतेस  मारहाण केली. तिचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतला. या झटापटीत तिला मुक्का मार लागला. एवढेच नाही तर आरोपींनी दगडाने पिडितेच्या गुप्त भागावर मारून तिला गंभीर जखमी केले.

मारहाण करून विनयभंग केल्याप्रकरणी पिडितेने पोलिसांत तक्रार दिली होती. या फिर्यादीवरून पोलिसांनी एकूण १६ जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.  तर  पिडीत मुलीस उपचारासाठी अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या गभीर प्रकाराची दखल घेत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी दोषींवर तात्काळ करण्याची मागणी ट्विटद्वारे केली होती.

Edited By : Jagdish Pansare.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख