माजीमंत्री बबनराव लोणीकर यांच्याविरुध्द गुन्हा

जिल्ह्यात वारंवार संचारबंदी लागू करू नये, अशी मागणी करणारे निवदेन त्यांनी यावेळी दिले होते. लोणीकर यांच्यासह माजी आमदार अॅड. विजयराव गव्हाणे, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुभाष कदम, गणेशराव रोकडे, बालाप्रसाद मुंदडा, बाळासाहेब भालेराव आदी पदाधिकारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी गेले होते.
fir file against ex minister babnrao lonikar news
fir file against ex minister babnrao lonikar news

परभणी ः राज्याचे माजी पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्याविरुध्द नवामोंढा पोलिस ठाण्यात जमावबंदीच्या आदेशाचे उल्लघंन केल्या प्रकरणी शुक्रवारी (ता.२४) गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. १४ जुलै रोजी लोणीकर हे  व्यापाऱ्यांचे एक शिष्टमंडळ घेऊन जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांच्याकडे निवेदन देण्यासाठी गेले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वारंवार संचारबंदी लागू करू नये अशी मागणी लोणीकर यांनी केली होती.

माजीमंत्री तथा विद्यमान भाजप आमदार बबनराव लोणीकर यांच्या विरोधात परभणीत गुन्हा दाखल झाला आहे. शहरात कोरोना विषाणु संसर्गामुळे जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. असे असतांना १४ जूलै रोजी लोणीकर हे व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळासह जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीला गेले होते.

जिल्ह्यात वारंवार संचारबंदी लागू करू नये, अशी मागणी करणारे निवदेन त्यांनी यावेळी दिले होते. लोणीकर यांच्यासह माजी आमदार अॅड. विजयराव गव्हाणे, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुभाष कदम, गणेशराव रोकडे, बालाप्रसाद मुंदडा, बाळासाहेब भालेराव आदी पदाधिकारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी गेले होते.

या प्रकरणी वर्तमानपत्रात छापून आलेल्या बातम्या व काही छायाचित्रांच्या आधारे नवामोंढा पोलिसांनी शुक्रवारी (ता.२४) बबनराव लोणीकर यांच्या विरोधात जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी गुन्ह्याची नोंद केली आहे.

शिवसेना खासदार, आमदारावरही गुन्हा..

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात अनाधिकृतपणे राजकीय कार्यकर्ते एकत्र जमवून घोषणाबाजी केल्या प्रकरणी परभणीचे शिवसेना खासदार संजय जाधव, आमदार डॉ. राहूल पाटील यांच्यासह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर नवामोंढा पोलिस ठाण्यात गुरुवारी (ता.२४) रात्री गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

 भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी शपथ घेतल्यानंतर जय भवानी, जय शिवाजी असा उल्लेख केला. यावर सभापती नायडू यांनी नाराजी व्यक्त करत उदयनराजे यांना समज दिली, तसेच शपथेतील मजकुरा व्यतिरिक्त त्यांनी केलेला जय भवानी, जय शिवाजी हा उल्लेख कामकाजातून काढून टाकण्यात येत असल्याचे सांगितले.

त्यानंतर राज्यभरात नायडू  यांच्या विरोधात संतापाची लाट उसळली होती. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याचा आरोप करत शिवसेनेने राज्यभरात आंदोलन छेडत या प्रकाराचा निषेध नोंदवला होता.
 

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com