ग्रामीण भागातील बचत गटांचे क्लस्टर तयार करून मोठ्या उद्योगांसाठी कर्ज द्या.. - Create clusters of self-help groups in rural areas and provide loans for large scale industries.jp75 | Politics Marathi News - Sarkarnama

ग्रामीण भागातील बचत गटांचे क्लस्टर तयार करून मोठ्या उद्योगांसाठी कर्ज द्या..

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 19 जुलै 2021

केंद्र शासनाच्या पंडित दीनदयाल उपाध्याय या  महत्वपुर्ण योजनेमार्फत औरंगाबाद जिल्ह्याला दिलेले उद्दिष्ट साध्य करण्याकरिता आपल्या स्तरावरून निर्देशित करावे.

औरंगाबाद ः   सशक्त महिला अभियानांतर्गत तसेच केंद्र व राज्य शासनाच्या वतीने जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा योजने मार्फत प्रत्येक बचत गटाला छोट्या उद्योगाकरिता कर्ज उपलब्ध करून दिले जाते.  परंतु या बचत गटांना मोठ्या उद्योगांसाठी कोणत्याही प्रकारे कर्ज दिले जात नाही. (Create clusters of self-help groups in rural areas and provide loans for large scale industries.)  तेव्हा ग्रामीण भागातील बचत गटांचे क्लस्टर तयार करून त्यांना मका प्रक्रिया, विविध मॉल्स व कोल्ड स्टोरेज प्रकल्प उभारण्यासह इतर उद्योगांसाठी मोठ्या प्रमाणात कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती अनुराधा चव्हाण यांनी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ.भागवत कराड यांच्याकडे केली आहे.

डाॅ. कराड यांचा नुकत्याच झालेल्या मंत्रीमंडळ विस्तारात समावेश करण्यात आला. कराड यांच्या रुपाने स्वातंत्र्यांच्या ६४ वर्षानंतर पहिल्यांदाज औरंगाबाद जिल्ह्याला केंद्रात मंत्रीपदाची संधी मिळाली. (Women and Child Welfare Speaker Anuradha Chavan, zhilha parisad Aurangabad) अर्थ खात्या सारखा महत्वाचा विभाग मिळाल्यामुळे कराड यांच्याकडून औरंगाबाद व मराठवाड्यातील जनतेच्या अपेक्षा वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण सभापती व त्यांच्या शिष्टमंडळाने नुकतीच दिल्लीत अर्थ राज्यमंत्री डाॅ.कराड यांची भेट घेतली.

मंत्रीपद मिळाल्याबद्दल त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केल्यानंतर चव्हाण यांनी केंद्र शासनामार्फत जिल्हा परिषदेत राबवल्या जाणाऱ्या योजना व त्यांना होणारा अर्थपुरवठा या संदर्भात चर्चा केली. विशेषतः ग्रामीण भागातील महिला बचत गटांना मोठ्या उद्योगांसाठी कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी आग्रही मागणी त्यांनी केली. यावेळी डाॅ. कराड यांना दिलेल्या निवदेनात अनुराधा चव्हाण यांनी विविध माण्या केल्या.  

मका प्रक्रियेसाठी प्रशिक्षण, अद्यावत यंत्रसामुग्रीसाठी कर्ज व बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी,  ग्रामीण भागातील छोट्या बचत गटांनी तयार केलेल्या वस्तू एकाच ठिकाणी विक्री करण्यासाठी मॉल्समध्ये जागा, त्यासाठीचे  प्रशिक्षण, सुविधा व कर्ज  उपलब्ध करून देण्यात यावे. बचत गटांनी शेतीतील पारंपारिक पद्धतीने व सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला शेतीमाल कलस्टर बचत गटाच्या उद्योग समुहाच्या मार्फत त्याचे अद्यावत पॅकिंग, निर्यात बाबतची व्यवस्था, जागतिक बाजारपेठ,व सुनियोजित प्रशिक्षण, कोल्ड स्टोरेज वाहने खरेदी यासाठी देखील केंद्रामार्फत कर्ज उपलब्ध करून देण्याचा विचार व्हावा, असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

केंद्र शासनाच्या पंडित दीनदयाल उपाध्याय या  महत्वपुर्ण योजनेमार्फत औरंगाबाद जिल्ह्याला दिलेले उद्दिष्ट साध्य करण्याकरिता आपल्या स्तरावरून निर्देशित करावे, अशी मागणी देखील करण्यात आली.  बचत गटांचे क्लस्टर प्रोजेक्ट तयार करून त्यांना मोठ्या प्रमाणात अल्प व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देणे, त्यांना सुयोग्य व तांत्रिक स्वरूपाचे प्रशिक्षण , जागतिक बाजारपेठ व स्थानिक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासंदर्भात देखील संबंधित यंत्रणेला आदेशित करावे, अशी मागणी देखील चव्हाण व त्यांच्या शिष्टमंडळाने डाॅ. कराड यांच्याकडे केली. यावेळी जि. प. सदस्य किशोर पवार, संजय खंबायते, रमेश जाधव, उपस्थित होते.

हे ही वाचा ः माजी मंत्री बबनराव लोणीकर यांची खंडपीठात माघार..

Edited By : Jagdish Pansare
       

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख