कोरोनाची लाट कमी होतेयं, हे डाॅ. तात्याराव लहाने यांचे विधान चुकीचे.. - The corona wave is declining, says Dr. Tatyarao Lahane's statement is wrong .. | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजासाठी केलेल्या मागण्या मान्य करण्याची राज्य सरकारची तयारी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संभाजीराजे छत्रपती यांची उद्या (17 जून) पाच वाजता वर्षा निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक

कोरोनाची लाट कमी होतेयं, हे डाॅ. तात्याराव लहाने यांचे विधान चुकीचे..

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 5 मे 2021

भाजप आमदार सुरेश धस यांनी उभारलेल्या कोविड केअर सेंटरचे उद॒घाटन बुधवारी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या हस्ते झाले. 

बीड : राज्याचे वैद्यकीय संचालक डॉ. तात्याराव लहाने यांचे ‘राज्यातील कोरानाची लाट कमी होण्यास सुरुवात झाली आहे’ हे वक्तव्य अतिशय चुकीचे असल्याचं मत भाजप आमदार सुरेश धस यांनी व्यक्त केले. (Director of Medical Education Dr. Tatyarao Lahnes Statment About Corona is Wrong)  राज्यभरात बहुतांश ठिकाणी कोरोना चाचणीसाठी आवश्यक असणाऱ्या किटची कमतरता आहे. त्यामुळे मागील आठ दिवसांपासून चाचण्याच बंद आहेत. कोरोनाची दाहकता वाढत आहे. मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी लाकडं कमी कमी पडत आहेत, अशा गंभीर परिस्थितीत डॉ. लहानेंचे वक्तव्य अतिशय चुकीच असल्याचा पुनरुच्चार धस यांनी केला

सुरेश धस यांच्या पुढाकारातून आष्टी येथील गणेश विद्यालयात उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरचे उद॒घाटन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या हस्ते बुधवारी झाले. (Bjp oposition leader Pravin Darekar Visit Covid Center) सुरेश धस यांनी अकराशे बेड्सचे विविध ठिकाणी सुरु केलेले छोटे छोटे कोवीड सेंटर हे महाराष्ट्रातील कुठल्याही नेत्याने केलेले नाही, असे गौरवोद्गार प्रविण दरेकर यांनी काढले.

दरेकर म्हणाले, जिल्ह्यात कोरोना परिस्थीती हाताळण्यात अपयश आल्याच्या बातम्या वाचून बीडचा दौरा केला. ( No Coordition Between Adminstraion and Government) प्रशासकीय यंत्रणा आणि शासन यांच्यात ताळमेळ नसल्यामुळे अनेक कोवीड सेंटरमधील रुग्ण तोंडाला मास्क न बांधता जनतेत मिसळतात,काही ठिकाणी कोवीड सेंटरवर जेवण मिळत नसल्यामुळे रुग्ण पळून जात असल्याचेही दिसून आले.

अंबाजोगाई येथे ऑक्सिजन कमी पडल्यामुळे रुग्ण दगावण्याचा आरोप नातेवाईकांनी केल्यानंतर सर्वात कहर म्हणजे एकाच रुग्णवाहिकेतून अनेक मृतदेह एकाच वेळेस नेण्याचा दुर्देंवी प्रकार या ठिकाणी घडला. यामुळे प्रशासन ढिसाळ असल्याचे दिसून येत आहे. (Government Reduse Corona Test )महाराष्ट्र शासनाचा टेस्टिंग कमी करण्याचा निर्णय हा केवळ रुग्णांची संख्या कमी दाखवण्यासाठी आहे असे दिसून आले आहे.

परंतु असे करणे म्हणजे भविष्यात फार मोठा धोका पत्करण्या सारखे आहे. बीड जिल्ह्यातील या उपाय योजना गतिमान होतील यासाठी मी निश्चितपणे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. तसेच तसेच आष्टी पाटोदा आणि शिरूर तालुक्यामध्ये काही गरज पडल्यास आपण मदत करणार आहोत, असेही दरेकर यांनी यावेळी सांगितले.

हे देखील वाचा : महाराष्ट्रातील कोरोनाचा प्रकार दक्षिणेत घालतोय धुमाकूळ

Edited By : Jagdish Pansare
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख