कोरोना योद्ध्यांना पन्नास लाखांचे सुरक्षा कवच,अन् दुर्दैवी मृत्यू झाल्यास वारसाला नोकरी द्या..

कुटुंबातील वारस म्हणून एका सदस्यास अनुकंपा तत्वावर तातडीने शैक्षणिक अर्हता नुसार त्या विभागाने विशेष बाब म्हणून नियुक्ती द्यावी.
Ncp Mp Fauzia Khan News Parbhani
Ncp Mp Fauzia Khan News Parbhani

परभणी ः कोरोना विषाणूविरुध्दच्या या लढाईत काम करणार्‍या सर्व स्तरावरील कोरोना योद्ध्यांना राज्य व केंद्र सरकारने विमा कवच द्यावे.  (Corona warriors get Rs 50 lakh security cover Demand Mp Faujiya Khan ) तसेच कोरोनाने मृत्यू पावलेल्या योद्ध्यांच्या कुटुंबातील सदस्यांस अनुकंपा तत्वावर नियुक्ती द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार फौजिया खान यांनी केली आहे. 

राज्य व केंद्र शासन निश्‍चितपणे प्रतिबंधात्मक उपाय करीत आहे.  ( in case of unfortunate death, give a job to the heirs.) औषधी, ऑक्सिजन पुरवठा, दवाखाने, डॉक्टर, ईतर मनुष्यबळ मिळवुन देण्याचा सर्वतोपरी प्रयत्न शासनामार्फत होत आहे, अशा या स्थितीत नागरिकांना देखील पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे मत खान यांनी व्यक्त केले.

मानधन व रोजंदारीवर काम करणारे कर्मचारी हे कोरोना महामारीच्या काळात कोरोना रोगाचे उपचार करणे, त्याचा संसर्ग वाढु नये म्हणून प्रतिबंधक उपाय योजना करणे, नागरिकांना अन्नधान्य व इतर आवश्यक सुविधा देणे याकरिता मोठ्या प्रमाणात काम करतात.  मात्र त्यांना शासकीय, निमशासकीय व शासनाचे अंगीकृत उपक्रमात काम करणारे अधिकारी कर्मचारी यांच्या प्रमाणे विमा कवच देण्यात येत नाही.

त्यामुळे मानधन व रोजंदारीवर काम कारणारे कर्मचारी तसेच आशा वर्कस, कोतवाल, पोलीस, पोलीस पाटील, स्वस्त धान्य दुकानदार, पत्रकार, मृत रुग्णाचे अंतीम संस्कार करणारे कर्मचारी इत्यादी यांना ५० लाखाचे विमा कवच मिळालेच पाहिजे, अशी आग्रही मागणी फौजिया खान यांनी केली आहे. 

शासकीय, निमशासकीय व शासनाचे अंगकृती उपक्रमातील काम करणारे कर्मचारी, अधिकारी कोरोना महामारीच्या काळात प्रतीबंधक उपाय योजना करणे व कोरोना वरील उपचार करणे यामध्ये योगदान देत आहेत. त्यांना या काळात कोरोना रोगाचा संसर्ग झाला किवा मृत्यु  आला तर  त्यांचे कुटुंबातील वारस म्हणून एका सदस्यास अनुकंपा तत्वावर तातडीने शैक्षणिक अर्हता नुसार त्या विभागाने विशेष बाब म्हणून नियुक्ती द्यावी, या मागणीसाठी आपण पाठपुरावा करणार आहेत, असेही खान यांनी स्पष्ट केले.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com