मोदींच्या कणखर नेतृत्वामुळे देशात कोरोनाचे संकट आटोक्यात

नरेंद्र मोदी यांनी कणखरपणे नेतृत्व करत कोरोनाचे संकट थोपवून ठेवले. तातडीने आरोग्य आणि इतर यंत्रणांना सतर्क करत, लॉकडाऊनची घोषणा केली त्याचे परिणाम आज आपल्याला कोरोना रुग्णांची व मृतांची संख्या कमी करण्यात मोठ्या प्रमाणात यश आले आहे. दोन महिन्यांच्या लॉकडाऊननंतर देश आणि राज्यातील अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी देखील मोंदीच्या मार्गदर्शनाखाली सरकारने देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी अनेक निर्णय घेतले आहेत. २० लाख कोटींच्या पॅकेजच्या माध्यमातून समाजातील सर्वच घटकांना या संकटातून सावरण्यासाठी मदत केली.
pravin dearekar press conferance news aurangabad
pravin dearekar press conferance news aurangabad

औरंगाबादः भारता इतकीच लोकसंख्या असलेल्या जगातील इतर राज्यात कोरोना रुग्णांची संख्या आपल्यापेक्षा २२ पट अधिक, तर मृत्यूचे प्रमाण हे ५० पटीने जास्त आहे. असे असतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या संकट काळात देशाचे नेतृत्व खंबीरपणे केले, धोका ओळखून वेळीच लॉकडाऊनचा निर्णय घेतला, त्यामुळे भारतात कोरोना आटोक्यात असल्याचा दावा विधान परिषदेतील भाजपचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरकेर यांनी पत्रकार परिषदेत केला.

औरंगाबाद येथे केंद्रातील मोदी सरकारला सत्तेवर येऊन एक वर्ष पुर्ण झाल्यानिमित्त तसेच गेल्या वर्षभरात आणि मागील पाच वर्षात मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारने घेतलेल्या अनेक महत्वाच्या व ऐतिहासिक निर्णायांची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी प्रवीण दरेकर म्हणाले, आज जगभरात कोरोनामुळे हाहाकार उडाला आहे.  लाखो लोकांना या महामारीमुळे आपले प्राण गमावावे लागले. अगदी आरोग्याच्या बाबतीत जगात पहिल्या क्रमांकावर असलेल्या राष्ट्रांमध्ये देखील कोरोनामुळे हजारो नागिरकांचे प्राण गेले. भारता एवढी लोकसंख्या असलेले जगातील अनेक देश आज कोरोनापुढे हतबल झाले आहेत.

भारतात मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कणखरपणे नेतृत्व करत कोरोनाचे संकट थोपवून ठेवले. तातडीने आरोग्य आणि इतर यंत्रणांना सतर्क करत, लॉकडाऊनची घोषणा केली त्याचे परिणाम आज आपल्याला कोरोना रुग्णांची व मृतांची संख्या कमी करण्यात मोठ्या प्रमाणात यश आले आहे. दोन महिन्यांच्या लॉकडाऊननंतर देश आणि राज्यातील अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी देखील मोंदीच्या मार्गदर्शनाखाली सरकारने देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी अनेक निर्णय घेतले आहेत. २० लाख कोटींच्या पॅकेजच्या माध्यमातून समाजातील सर्वच घटकांना या संकटातून सावरण्यासाठी मदत केली आहे. 

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आवश्यक असलेले मास्क, पीपीईकीट ज्याचे उत्पादन आतापर्यंत कधीही आपल्या देशात झाले नव्हते, ते देखील आपण तयार करू लागलो. देशात कोरोनाशी दोन हात करतांना सरकारने राज्य सरकारला देखील वेगवेगळ्या माध्यमातून मदत केली आहे. जागतिक कर्ज घेण्यासाठीची ३ टक्यांची मर्यांदा ५ टक्यांपर्यंत वाढवली, त्यामुळे महाराष्ट्राला राज्याच्या विकासाला आणि एकूणच कोरोनामुळे अडचणीत आलेली अर्थव्यवस्था सावरण्याला मदत होणार आहे. २ लाख २१ कोटींची मदत केंद्राने राज्याला केल्याचा दावा दरेकर यांनी पत्रकार परिषदेत केला.

कलम ३७०, राम मंदिराचा प्रश्न मार्गी...

गेल्या पाच वर्षात केंद्रीतील मोदी सरकराने धाडसी, ऐतिहासिक निर्णय घेतले. कश्मिरमधून कलम ३७० हटवले जाईल असे स्वप्नातही वाटले नव्हते, पण हा निर्णय घेत मोदी सरकारने कश्मिर भारताचा अविभाज्य भागा आहे प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले. देशातील कोट्यावधी हिंदू आणि हिंदुत्ववादी जनतेच्य अस्मितेचा प्रश्न बनलेल्या राम मंदिराचा विषय देखील न्यायव्यवस्थेच्या माध्यमातून सोवला आणि आता आयोध्येत भव्य असे राम मंदीर उभारण्याचा मार्ग मोकळा झाला. देशातील मुस्लिम महिलांची तीन तलाकच्या जोखडातून मुक्तता हे देखील केंद्रातील भाजप सरकारने टाकलेले एक महत्वाचे पाऊल ठरले. 

बांगलादेश, अफगाणिस्तान या देशाला लागून असलेल्या राष्ट्रामंधील पिडीत नागरिकांना भारतात शरण देऊन त्यांना नागरिकत्व देण्यासाठी सीसीए सारखा महत्वाचा कायदा याच सरकारने करत केवळ देशातील नाही, तर बाहेरच्या राष्ट्रांमध्ये हालअपेष्टा सोसत असलेल्यांची देखील काळजी घेतली आहे. शेतकऱ्यांच्या मालाला दीडपट हमीभाव, आपला माल थेट विक्री करण्यास मुभा यातून देशातील शेतकरी वर्गाला दिलासा देण्याचे मोठो काम देखील गेल्या पाच-सहा वर्षात सरकारने केले.

उद्धव ठाकरेंचे आम्हीही स्वागत करू..

महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असूनही देशातील लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत उद्धव ठाकरे यांचा पाचवा क्रमांक आहे. याकडे लक्ष वेधले असता, दरेकर म्हणाले, याचा आम्हालाही आनंद आहे, वाईट वाटण्याचे काहीच कारण नाही. राज्यातील गोरगरीब, कष्टकरी, मजुर, कामगार व सर्वसामान्यांना त्यांनी कोरोनाच्या संकटातून वाचवावे, आम्ही देखील त्यांचे स्वागत करू. पण आज राज्यातील परिस्थीती हाताबाहेर चालली आहे. त्यामुळे अशा संकटाच्यावेळी कुणीही राजकारण करु नये, आम्हीही ते करत नाही.

राज्यपालांच्या भेटी, सरकार पाडण्याचे प्रयत्न सुरू आहेत, राष्ट्रपती राजवट लागू होणार, या सगळ्या अफवा आहेत. भाजपने सरकार पाडण्याचे कधीही प्रयत्न केले नाहीत, किंवा राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली नाही. आमची मागणी एकच आहे, ती म्हणजे कोरोनाच्या संकटातून राज्याला वाचवा, आरोग्य सुविधांची पुर्तता करा.

राजकारण करण्याची, सरकार पाडण्यासाठी आमदारांची जुळवाजुळव करण्याची ही वेळ नाही. कोरोनाचे संकट गेल्यानंतर राजकारण करायला भरपूर वेळ आहे, तेव्हा काय भूमिका घ्यायची ते वरिष्ठ नेते ठरवतील, असा सूचक इशारा देखील प्रवीण दरेकर यांनी दिला.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com