जनआशिर्वाद यात्रेतूनही कोरोना जनजागृतीच करतोय..

जनआशिर्वाद यात्रा ही केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभरातील विविध राज्यात सुरू आहे.
Dr.Bhagwat Karad- Sanjay Ruat New Aurangabad
Dr.Bhagwat Karad- Sanjay Ruat New Aurangabad

औरंगाबाद ः केंद्रात नव्याने मंत्री झालेले देशभरातील सर्वच मंत्री आपापल्या भागात जनआशिर्वाद यात्रा काढत आहेत. ही यात्रा काही फक्त महाराष्ट्रात नाही, तर देशभरात सुरू आहे. (Corona is also raising awareness through Jana Aashirwad Yatra.) कोरोनाचे नियम तर आम्ही पाळतोच आहोत, पण या माध्यमातून कोरोनापासून बचाव कसा करावा, यासाठी जनजागृती देखील करतोय, अशा शब्दांत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांनी संजय राऊत यांनी केलेला आरोप खोडून काढला.

डाॅ. कराड यांच्या मार्गदर्शनाखाली मराठवाड्यातील पाच लोकसभा मतदारसंघात सध्या जनआशिर्वाद यात्रा सूरू आहे. (Central State Finance Minster Dr.Bhagwat Karad) ठिकठिकाणी या यात्रेला उत्सफूर्त प्रतिसाद मिळत आहे. केंद्राकडून राबवल्या जाणाऱ्या योजना आणि मोदी सरकारने केलेली विकासकामे याची माहिती  जनआशिर्वाद यात्रेच्या माध्यमातून दिली जात आहे. (Shivsena Leader Sanjay Raut) दरम्यान, शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी जनआशिर्वाद यात्रा म्हणजे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण असल्याची टीका केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अडचणीत आणण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप देखील त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना केला. या संदर्भात केंद्रीय अर्थमंत्री डाॅ. भागवत कराड `सरकारनामा`शी बोलतांना म्हणाले, जनआशिर्वाद यात्रा ही कोरोना वाढावा यासाठी नाही, तर या महामारीच्या विरोधात जनजागृती हा देखील एक भाग आहे. कोरोनाचे सगळे नियम आम्ही स्वतः पाळत आहोत, सहभागी होणाऱ्यांना देखील सांगत आहोत. जनआशिर्वाद यात्रा ही केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभरातील विविध राज्यात सुरू आहे.

यात्रेचा संबंध मुख्यमंत्र्यांशी जोडू नये..

देशात राबवण्यात येत असलेली कोरोना लसीकरण मोहिम यशस्वी करण्याचे आवाहन देखील आम्ही या निमित्ताने करतो आहोत. त्यामुळे शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलेले विधान हे अत्यंत चुकीचे आहे. मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणण्यासाठी किंवा तिसऱ्या लाटेला आमंत्रण हा त्यांचा दावा दिशाभूल करणारा आहे. त्यांनी जनआशिर्वाद यात्रेचा संबंध मुख्यमंत्र्यांशी जोडू नये.

केंद्र सरकारने सर्वसामान्य जनतेसाठी राबवलेल्या योजनांची माहिती, त्याचा लाभ घेण्याचे आवाहन जनआशिर्वाद यात्रेच्या माध्यमातून आम्ही करतो आहोत. कोरोनाची तिसरी लाट यामुळे येईल, असे म्हणणे चुकीचे आणि जनआशिर्वाद यात्रेला बदनाम करणारे आहे, असेही डाॅ.कराड म्हणाले.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com