Minister ashok chvan- Oxyegn Tank Instal news nanded
Minister ashok chvan- Oxyegn Tank Instal news nanded

नांदेडच्या शासकीय रुग्णालयासह, जिल्हा रुग्णालयात ऑक्सीजन टॅंकची उभारणी

२० हजार लिटर क्षमतेचा एक मोठा टॅंक मागवण्यात आला असून, दोन दिवसांत त्याचा वापर सुरू होणे अपेक्षित आहे.

नांदेड ः रुग्णांना बेड मिळत नाही, ऑक्सीजन बेड उपलब्ध नाहीत, आॅक्सीजन मुबलक प्रमाणात नाही, अशी ओरड मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या पार्श्व्भूमीवर नांदेडमधील डाॅ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय रुग्णालय तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयात ऑक्सीजनचा साठा करण्यासाठी भला मोठा टॅंक उभारण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू झाले आहे.

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडच पालकमंत्री अशोक चव्हाण यांनीच ही माहिती ट्विटच्या माध्यमातून दिली आहे. राज्यात व मराठवाड्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढतो आहे. नांदेड, बीड, औरंगाबाद या मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तर कोरोना रुग्णांची संख्या धक्कादायक आहे. या जिल्ह्यातील मृत्यूदर देखील चिंता करायला लावणार  आहे.

दोन दिवसांपुर्वीच राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रत्येक जिल्ह्यात ऑक्सीजनचा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पत्रकारांशी बोलतांना सांगितले होते. ज्यामुळे त्या त्या जिल्ह्यातील ऑक्सीजनची मागणी या प्रकल्पाच्या मार्फत पुर्ण केली जाणार आहे.

हे प्रकल्प जिल्ह्यांमध्ये सुरू व्हायला दोन-तीन महिन्यांचा अवधी लागू शकतो. परंतु तुर्तास जिथे ऑक्सीजनची कमतरता मोठ्या प्रमाणात जाणवते आहे, तिथे ऑक्सीजन साठवण्यासाठी मोठे टॅंक बसवण्यात येत आहेत. अशोक चव्हाण यांनी नांदेड शासकीय तथा जिल्हा सामान्य रुग्णालयात हे काम् सुरू केले आहे.

ट्विटरवर याची माहिती देतांना अशोक चव्हाण म्हणाले, नांदेडच्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात  लिक्विड ऑक्सीजनचा अधिक साठा करणे शक्य व्हावे, यासाठी  २० हजार लिटर क्षमतेचा एक मोठा टॅंक मागवण्यात आला असून, दोन दिवसांत त्याचा वापर सुरू होणे अपेक्षित आहे. जिल्हा सामान्य रूग्णालयातही असाच एक मोठा टॅंक लवकरच बसवण्यात येईल.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com