कॉंग्रेसच्या राठोड यांची संपत्ती सहा कोटींची, तरी १.३५ लाखाचे वीज बील थकीत

विविध बॅंकांची कर्ज, वैयक्तिक व शासकीय अशी ३ कोटी ९ हजार ९७९ रुपयांची देणी असल्याचे राजेश राठोड यांनी स्पष्ट केले आहे. यात महावितरण कंपनीच्या वीज बीलासह एकूण ३१ लाख ४५ हजार ३५९ इतकी शासकीय देणी असल्याचे राठोड यांनी नमूद केले आहे.
congress cadidate rathods asset news
congress cadidate rathods asset news

औरंगाबादः विधान परिषदेतील कॉंग्रेसचे एकमेव उमेदवार राजेश राठोड यांच्या नावे सहा कोटी रुपयांची मालमत्ता असलल्याचे त्यांनी जोडलेल्या निवडणूक शपथपत्रावरून स्पष्ट झाले आहे. राठोड यांच्याकडे जंगम व स्थावर अशी एकूण सहा कोटीहून अधिकची संपत्ती असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये ४३ लाखांची जंगम तर ५ कोटी ६५ लाखांची स्थावर मालमत्ता असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

राज्यातील नऊ जागांच्या निवडणुकीच्या कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर कॉंग्रेसने आपल्या एका जागेसाठी जालन्याचे राजेश राठोड यांची उमेवारी जाहीर केली होती. सोमवारी दुपारी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. विधान परिषदेतील एका जागेसाठी कॉंग्रेसने प्रदेश समिती सदस्य तथा जिल्हा परिषदेचे माजी सभापती राहिलेले राजेश राठोड यांना उमेदवारी जाहीर केली होती.

राजेश राठोड हे कॉंग्रेसचे विधान परिषदेतील माजी आमदार धोंडीराम राठोड यांचे चिरंजीव आहेत. जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यात राठोड यांच्या शैक्षणिक संस्था असून उमरखेडा हे त्यांचे मुळ गाव आहे. शपथपत्रातील विवरणानूसार मंठा, उमरखेडा येथे राठोड यांच्‍या नावे शेती, प्लॉट, घर आदी ५ कोटी ६५ लाख ६३ हजार २१२ रुपयांची स्थावर तर रोख, बॅंक डिपॉझीट, शेअर्स इन्शूरन्स, सोने, ट्रॅक्टर, इनोव्हा कार अशी ४३ लाख २४ हजार ६४३ रुपयांची जंगम मालमत्ता आहे.

तर त्यांच्या पत्नीच्या नावे ६ लाख ८५३ हजारांच्या जंगम व स्थावर मालमत्तेसह एकूण २७ लाख ९६ हजार ४०० रुपयांची मालमत्ता असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या शिवाय विविध बॅंकांची कर्ज, वैयक्तिक व शासकीय अशी ३ कोटी ९ हजार ९७९ रुपयांची देणी असल्याचे राजेश राठोड यांनी स्पष्ट केले आहे. यात महावितरण कंपनीच्या वीज बीलासह एकूण ३१ लाख ४५ हजार ३५९ इतकी शासकीय देणी असल्याचे राठोड यांनी नमूद केले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com