काॅंग्रेस-राष्ट्रवादीने राज्यातील साखर कारखाने आपापसात वाटून खाल्ले.. - The Congress-NCP divided the sugar factories in the state. | Politics Marathi News - Sarkarnama

काॅंग्रेस-राष्ट्रवादीने राज्यातील साखर कारखाने आपापसात वाटून खाल्ले..

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 15 जुलै 2021

सर्व साखर कारखाने पुन्हा शेतकऱ्यांच्या मालकीचे व्हावेत, यासाठी भविष्यात रयत क्रांती संघटना आंदोलन करील.

नांदेड ः  सहकार चळवळीच्या उद्देशाला कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसने हरताळ फासला आहे. या दोन्ही पक्षांतील नेत्यांनी साखर कारखाने आपसात वाटून घेत या चळवळीचे श्राद्ध घातल्याचा आरोप रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष, माजी कृषी राज्यमंत्री आमदार सदाभाऊ खोत यांनी केला. (The Congress-NCP divided the sugar factories in the state.)

रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून राज्यभर शेतकऱ्यांशी संवाद सुरू आहे. जिल्ह्यात आत्महत्या केलेल्या दोन शेतकऱ्यांच्या कुटुंबियांची खोत यांनी बुधवारी (ता. १४) भेट घेतली. पत्रकारांशी बोलतांना त्यांनी काॅंग्रेस-राष्ट्रवादीवर टीकास्त्र सोडले. ( Ex. State Agriculter Minister Sadabhau Khot)

खोत म्हणाले, राज्यात सहकार क्षेत्राच्या माध्यमातून सर्वसामान्य माणूस, शेतकऱ्यांना मालक बनविण्याची चांगली कल्पना होती. ( Suger Factory In Maharashtra) त्यातून साखर तसेच इतर कारखाने उभे राहिले. कॉँग्रेस, राष्ट्रवादी काॅंग्रेसने हे कारखाने आपसात वाटून घेतले आहेत. राज्यात ५५ सहकारी साखर कारखान्यांत २५ हजार कोटींचा घोळ आहे.  त्यात जिल्हा सहकारी बँकांचेही हात गुंतलेले आहेत.

सहकारी साखर कारखान्यांत सरकारचे बाराशे कोटी तर शेतकऱ्यांचे अडीच हजार कोटीच्या घरात भागभांडवल आहे. आता हे कारखाने दहा ते वीस कोटी रुपयांमध्ये खरेदी करून शेतकऱ्यांची वाट लावली जात आहे.

असे सर्व साखर कारखाने पुन्हा शेतकऱ्यांच्या मालकीचे व्हावेत, यासाठी भविष्यात रयत क्रांती संघटना आंदोलन करील, असा इशाराही खोत यांनी दिला.

हे ही वाचा ः महाविकास आघाडी सरकारचा रिमोट कंट्रोल शरद पवार यांच्याच हाती..

Edited By : Jagdish Pansare
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख