मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन, मोदींना अनेक प्रश्न विचारायचेत..

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मी मनापासून आभार मानतो, कारण त्यांनी बैठकीत आम्ही उपस्थित केलेल्या सगळ्याच मुद्यावर अगदी सविस्तर चर्चा करून काही प्रश्न तातडीन मार्गी देखील लावले.
mimtiaz jalil congratulate cm, and ask sum qutaion to pm news
mimtiaz jalil congratulate cm, and ask sum qutaion to pm news

औरंगाबादः जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे, रुग्णांची आणि मृतांची संख्या झपाट्याने वाढते आहे. अशावेळी केवळ प्रशासनाला दोष देऊन चालणार नाही, तर सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन मार्ग काढला पाहिजे ही भूमिका मी मांडली होती, त्याला खासदार, आमदारांनी प्रतिसाद दिला. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आम्हाल वेळ देऊन एक बैठक घेण्याची विनंती केली. तात्काळ त्यांनी काल आम्हाला वेळ देऊन मिटिंग घेतली, विशेष म्हणजे सगळ्या सचिवांना सोबत ठेवले आणि तातडीने अनेक विषय मार्गी लावले. त्याबद्दल मी मुख्यमंत्र्यांचे मनापासून आभार मानतो. तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेचे अधिवेशन लवकर बोलवावे, आम्हाला त्यांना अनेक प्रश्न विचारायचे आहेत, असा टोला एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी लगवाला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादेत काल सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर, रात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत देखील महत्वाची आणि निर्णायक बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पार पडली. या संदर्भात सविस्तर माहिती इम्तियाज जलील यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून लोकांनी दिली.

इम्तियाज जलील म्हणाले, कोरोनाच्या संकटात राजकारण करायचे नाही, लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून शहर आणि जिल्हा कोरोनामुक्त करण्यासाठी शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, कॉंग्रेस अशा सगळ्याच राजकीय पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन चर्चा करू, कोरोना कसा आटोक्यात आणायचा याचा विचार करू, असा प्रस्ताव मी फोन करून सर्व लोकप्रतिनिधींना दिला होता. मला आनंद आहे की, यावर सर्वांनी सहमती दर्शवली आणि काही चांगले निर्णय सगळ्यांच्या प्रयत्नातून झाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मी मनापासून आभार मानतो, कारण त्यांनी बैठकीत आम्ही उपस्थित केलेल्या सगळ्याच मुद्यावर अगदी सविस्तर चर्चा करून काही प्रश्न तातडीन मार्गी देखील लावले. घाटीतील सुपर स्पेशालिटीची दीडशे कोटी खर्चून तयार केलेली इमारत सज्ज आहे.

 पण केवळ तिथे तज्ञ डॉक्टर, टेक्निशियन, नर्सिग स्टाफ आणि इतर कर्मचाऱ्यांची पद भरण्यात आलेली नाही, म्हणून कोविड सारख्या संकटात ती आपल्याला वापरता येत नाही. हा मुद्दा मी प्रकर्षाणे मांडला. मुख्यमंत्र्यांना तो पटला आणि त्यांना तातडीने सचिवांना निर्देश देऊन घाटीसाठी आवश्यक असलेली सगळी पद, आणि इतर सुविधा पुरवण्यास सांगितले. 

कोरोना आजारावरील खाजगी रुग्णालयातील उपचार अत्यंत महागडे आहेत, त्याचा समावेश महात्मा ज्योतीबा फुले जीवनदायी आरोग्य योजनेत करण्याची मागणी देखील त्यांनी मान्य केली, लवकरच त्याचे शासकीय आदेश निघतील. अत्यंत महत्वाचे असे हे प्रश्न मुख्यमंत्र्यांनी तातडीने मार्गी लावले, त्यामुळे मी त्यांचे मनापासून आभार मानतो. शेवटी मी जरी विरोधी पक्षाचा खासदार असलो, तरी जे चांगले काम आहे, त्याचे स्वागत आणि अभिनंदन करायलाच हवे, राजकारणाच्या वेळी राजकारण करू, असेही इम्तियाज यांनी स्पष्ट केले.

मोदीजीअधिवेशन बोलवा..

मला अनेकजण राज्यातील शाळा, कॉलेजेस कधी सुरू होणार असा प्रश्न विचारतात. केंद्र सरकारही त्या बाबतीत विचार करत असल्याचे समजते. पण मी पंतप्रधान मोदींना विनंती करेन, की कृपया शाळा, महाविद्यालये सुरू करून विद्यार्थ्यांचे जीव धोक्यात घालू नका.

आपण स्वतःची काळजी म्हणून संसदेचे अधिवेशन बोलवत नाही आहोत, मग विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात कशासाठी घालायचा? असा सवाल करतांनाच मोदीची संसंदेचे अधिवेशन लवकर बोलवा, तुम्हाला अनेक प्रश्न विचारायचे आहेत, अनेक गोष्टीची उत्तरे घ्यायची आहेत, असा टोलाही इम्तियाज जलील यांनी लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com