औरंगाबादकरांनो अनलाॅकबद्दल अभिनंदन, पण जबाबदारीने वागा, नाही तर.. - Congratulations to Aurangabadkars for unlocking, but act responsibly, if not .. | Politics Marathi News - Sarkarnama

औरंगाबादकरांनो अनलाॅकबद्दल अभिनंदन, पण जबाबदारीने वागा, नाही तर..

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 7 जून 2021

निर्बंध हटले असले तरी कोरोना अजून गेलेला नाही, याचे भान आणि जबाबदारी शहराचे सुज्ञ नागरिक म्हणून प्रत्येकाने ठेवायलाच हवे.

औरंगाबाद ः कोरोना रुग्णांची संख्या घटवून शहराचा पाॅझीटीव्हीटी रेट पाच टक्क्यांपेक्षा खाली ठेवण्यात आपल्याला यश आले आहे. आॅक्सीजन बेडची संख्या देखील २५ टक्यांपेक्षा कमी असल्याने आपण लेवल एकमध्ये आहोत. राज्य सरकारच्या नियमावलीनूसार आपण शहरातील निर्बंध पुर्णपणे हटवले आहेत. (  Congratulations to Aurangabadkars for unlocking, but act responsibly, if not ,said Administrator Astikkumar Pandey) त्याबद्दल मी औरंगाबादकरांचे अभिनंदन करतो, पण त्याच बरोबर जबादारीने वागण्याचे आवाहन देखील करतो, असे म्हणत महापालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी आज नागरिकांशी संवाद साधला.

निर्बंध उठले असले तरी कोरोनाचे नियम प्रत्येकाने स्वयंशिस्तीने पाळायचे आहेत, त्यात कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा आपल्याला पुन्हा लाॅकडाऊनच्या दिशेने घेऊन जाऊ शकतो, असा इशाराही पांडेय यांनी दिला.(Any kind of negligence can lead you back to the lockdown) कोरोना रुग्णांची घटती संख्या आणि आॅक्सीजन बेडची संख्या या निकषावर शहरातील सर्व प्रकारचे निर्बंध आज सकाळी सात वाजेपासून हटवण्यात आले.

शहरात आज पहिल्या दिवशी नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडले.(A large number of citizens rushed out of their homes on the first day in the city today.) नोकरी, व्यवसाय, कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या नागरिकांमध्ये दोन महिन्यांचे कडक निर्बंध आणि आता घ्यावयाची काळजी, याबद्दल बऱ्यापैकी जागृकता दिसून आले. मास्क, सॅनिटायजर आणि सोशल डिस्टनसचे पालन खाजगी, शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये होतांना दिसले. गर्दी टाळण्याकडे देखील नागरिकांचा कटाक्ष दिसून आला.

या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधला. पांडेय म्हणाले, शहरातील निर्बंध शिथिल झाल्याबद्दल सर्वप्रथम मी नागरिकांचे आभार मानतो. कोरोना रुग्णांचा पाॅझीटीव्हीटी दर कमी करण्यात जसा प्रशासनाचा वाटा आहे, त्यापेक्षा किती तरी तो सर्वसामान्यांचा आहे. निर्बंध हटल्यामुळे आता परिस्थिती पुर्वपदावर येईल, परंतु आपले दैनंदिन व्यवहार सुरू असतांना प्रत्येकाने जबाबदारीने वागणे अत्यंत गरजेचे  आणि महत्वाचे आहे.

दर गुरवारी आढावा..

शहरातील कोरोना पाॅझीटीव्हीटी दर आणि आॅक्सीजन बेडची संख्या याचा आढावा दर गुरुवारी बैठक घेऊन घेण्यात येणार आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या पाच टक्यांच्या वर जाणार नाही, आणि आक्सीजन बेडचे प्रमाण २५ टक्यांपेक्षा जास्त वाढणार नाही,  याची काळजी आपण सर्वांनाच घ्यायची आहे. निर्बंध हटले असले तरी कोरोना अजून गेलेला नाही, याचे भान आणि जबाबदारी शहराचे सुज्ञ नागरिक म्हणून प्रत्येकाने ठेवायलाच हवे, तर आपण शहराला लेव्हल एकमध्ये ठेवू शकू.

थोडाही निष्काळजीपणा आपल्या पुन्हा लेव्हल तीन-चारच्या निर्बंधाकडे घेऊन जाऊ शकतात. कोरोना रुग्णांचा पाॅझीटीव्हीटी दर पाच टक्यांच्या वर जाऊ नये यासाठी, महापालिका चाचण्यांची संख्या व आॅक्जीजन बेडची संख्या ८०० ने वाढवत आहे. जेणेकरून लेव्हल एकच्या शासनाच्या निकषात आपले शहर राहील.  प्रशासनाच्या या प्रयत्नाला नागरिकांनी देखील कोरोनाचे नियम कोटेकोरपणे पाळून जबाबदारीने वागून हातभारा लावावा, असे आवाहनही पांडेय याांनी केले.

हे ही वाचा ः पीक विमा कंपन्यांची नफेखोरी मुख्यमंत्र्यांकडून उघड, केंद्रीय कृषीमंत्र्यांना पाठवले पत्र..

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख