कलेक्टर, सीईओ, एसपी रस्त्यावर; वाहनांच्या कागदपत्रांसह बाहेर पडणाऱ्यांची केली तपासणी - Collector, CEO, SP on the road; Examination of exits with vehicle documents | Politics Marathi News - Sarkarnama

कलेक्टर, सीईओ, एसपी रस्त्यावर; वाहनांच्या कागदपत्रांसह बाहेर पडणाऱ्यांची केली तपासणी

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 7 मे 2021

खुद्द जिल्हाधिकारी रविंद्र जगताप, पोलिस अधीक्षक राजा रामास्वामी, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, तहसिलदार शिरीष वमने रस्त्यावर उतले. रविंद्र जगताप यांनी खरोखर गरजेमुळे बाहेर पडल्याची व परवान्यांची खातरजमा केली. 
 

बीड : कोरोना विषाणू संसर्गाच्या रुग्णांची वाढती संख्या अटोक्यात आणण्यासाठी 
कडक लॉकडाऊनमध्येही लोकांची वर्दळ असल्याच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी (ता. सहा) 
खुद्द जिल्हाधिकारी रविंद्र जगताप, पोलिस अधीक्षक राजा रामास्वामी, मुख्य कार्यकारी  अधिकारी अजित कुंभार रस्त्यावर उतरले. Collector Jagtap, Sp Rjaa Ramaswami And Ceo Ajeet Kumbhar On road For Checking) त्यांच्या सोबतीला तहसिलदार शिरीष वमनेही हाते.

बडे अधिकारीच रस्त्यावर उतरुन तपासण्या करत असल्याने जागोजागी लावलेली यंत्रणाही टाईट झाली. (corona, Lockdwon Reviewe) जगताप, कुंभार, राजा, वमने यांनी गुरुवारी दुपार पासून सायंकाळ पर्यंत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक, बार्शी नाका, जालना रोड, सुभाष रोड, मोमीनपुरा, शिवाजी नगर ठाणे या गर्दींच्या परिसरात थांबून येणाऱ्या - जाणाऱ्यांना दुचाकीस्वरांना थांबवून चौकशी केली.

अगदी जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: लोकांना थांबवून त्यांचे बाहेर पडण्याची कारणे जाणून घेतली. काही सामान्य लोक विना मास्क आढळल्यानंतर पथकाने स्वत: त्यांच्या तोंडाला मास्कही लावला. दरम्यान, बाहेर पडणाऱ्यांमध्ये बहुतांशी रुग्णांचे नातेवाईक, स्वत: रुग्ण किंवा आरोग्य सेवेतील अधिकारी, कमचारी आणि नव्याने भरती झाल्यानंतर रुजू 
होण्यासाठी निघालेले होते, असे रविंद्र जगताप यांनी सांगीतले.

बाहेर जिल्ह्यातून येणारी वाहनेही नियमानुसार पास घेऊन आलेली असल्याचे यावेळी दिसले. दरम्यान, त्रिमुर्ती रस्त्यावर उतरल्याने यंत्रणाही अलर्ट झाली. (Gardiuan Minister Dhnanjay Munde Also Order Administrativ Officers) काही दिवसांपुर्वी कोरोना आढावा बैठकीत पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी शटर बंद, आतून सर्व चालू अशी शहरातील लाॅकडाऊनची परिस्थिती असल्याचे नमूद करून नाराजी व्यक्त केली होती.

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या, होणारे मृत्यू पाहता लाॅकडाऊनची कठोर अंमलबजावणी केली जावी, अशा सूचना मुंडे यांनी या बैठकीत प्रशासनाला दिल्या होत्या. त्यानंतर हे तीनही वरिष्ठ अधिकारी रस्त्यावर उतरल्याचे बोलले जाते.

ही बातमी देखील वाचा ः मराठा आरक्षणासंदर्भात पुर्नयाचिका दाखल करणार-एकनाथ शिंदे

Edited By : Jagdish Pansare

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख