जमावबंदी असतांना सामुहिक नमाज पठण, बाबाजानी दुर्राणी यांच्या विरोधात गु्न्हा दाखल

सर्व धार्मिक सण, उत्सव घरातच राहून साजरे करावे, असे आवाहन पोलिस अधिक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी धर्मगुरू, मौलवीं तसेच धार्मिक स्थळांच्या जबाबदार व्यक्तींना केले होते. त्यानंतरही पाथरीत असा प्रकार घडला.
mla babajani durani news pathri
mla babajani durani news pathri

पाथरीः कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर जमाव बंदीचे आदेश लागू असतांना ते धुडकावत सामुहिकरित्या घरासमोरील मैदानावर नमाज पठण केल्याबद्दल राष्ट्रवादीचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्यासह शंभरहून अधिक जणांविरुध्द पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज रमझान ईद असली तरी प्रत्येकाने आपापल्या घरात सुरक्षित अंतर पाळत प्रार्थना करण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले होते. राज्यात सर्वत्र जमावबंदी व लॉकडाऊनचे पालन काटेकोरपणे करण्यात आले असतांना पाथरीत मात्र या नियमाचे उल्लंघन आमदारांकडूनच करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

कोरोना विषाणुचा संसर्ग राज्यात मोठ्या प्रमाणात वाढला आहे, आजघडीला राज्यात पन्नास हजाराहून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकार व स्थानिक प्रशासन युध्द पातळीवर प्रयत्न करत आहेत. त्यासाठी २३ मार्चपासून टाळेबंदी घोषित करण्यात आली आहे.  परभणी जिल्ह्यात देखील जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी जमावबंदीचे आदेश दिलेले आहेत. सोमवारी  जिल्हाभरात रमजान ईद साजरी करण्यात आली. या निमित्ताने कुठेही सार्वजनिकरित्या गर्दी करून नमाज पठण करू नये असे स्पष्ट आदेश जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधिक्षकांकडून देण्यात आले होते. 

परंतू पाथरी येथे विधान परिषद सदस्य बाबाजानी दुर्राणी यांनी त्यांच्या समर्थकांसह सार्वजनिक ठिकाणी नमाज पठण करत शासकीय आदेशाला केराची टोपली दाखवली. दुर्राणी यांच्यासह शंभरहून अधिक जण या नमाज पठणात सहभागी झाले होते. या प्रकरणी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्यासह तबरेज खान रहेमान खान दुर्राणी, तारेख खान आब्दुला खान दुर्राणी, हरून मौलाना सारोलवी, शेख जमील, शेख रशीद, छड्या अब्दुल रज्जाक, शेख मतीन कपडेवाला, मुस्तफा टेलर, शेख खय्युम शेख नत्रु, अजहर शेख, फेरोज खान, रज्जाक सय्यद, शमीम भाई, सलीम सय्यद, पाशाभाई फैजू, मोईज अन्सारी यांच्यासह इतर १०० ते १२५ जणांवर पाथरी पोलिस ठाण्यात गु्न्हे दाखल करण्यात आले आहेत.

राज्यात आलेल्या कोरोना विषाणुचे संकट टाळण्यासाठी व त्याचा प्रसार होऊ नये यासाठी नागरीकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, एकत्र जमू नये. सर्व धार्मिक सण, उत्सव घरातच राहून साजरे करावे, असे आवाहन पोलिस अधिक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी धर्मगुरू, मौलवीं तसेच धार्मिक स्थळांच्या जबाबदार व्यक्तींना केले होते. त्यानंतरही पाथरीत असा प्रकार घडला. यापुढे लॉकडाऊन आणि राज्य शासनाकडून पुढील आदेश येत नाही तोपर्यंत सगळ्यांनी जमावबंदी आदेशाचे पालन करावे, याचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा या निमित्ताने  देण्यात आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com