औरंगाबाद ः मास्क न वापरणाऱ्यावर मोठ्या प्रमाणात दंड तर वसुल कराच, पण त्यानंतरही नियम पाळले जात नसतील तर अशा लोकांवर गुन्हे दाखल करा, असे आदेश विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी मराठवाड्यातील जिल्हाधिकारी व संबंधित यंत्रणेला दिले आहेत. कुठल्याही प्रकारचा निष्काळजीपणा काॅन्टॅक्ट ट्रेसिंग, टेस्टींगमध्ये खपवून घेतला जाणार नाही, यासाठी सीईओ, महापालिका आयुक्तांना देखील जबाबदार धरण्यात येईल, असा इशारा देखील केंद्रकर यांनी दिला आहे.
राज्यात पुन्हो कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्तांची महत्वाची व्हिडिओ काॅन्फरन्स घेऊन कोरोना नियमांची अंमलबजावणी कठोरपणे करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर मराठवाड्याचे विभागीय आयुक्तांनी देखील आठही जिल्ह्यातील जिल्हाधिकारी व इतर विभागांच्या अधिकाऱ्यांना कडक शब्दांत सूचना व समज दिली.
कोरोनाची लक्षणं किवा सर्दी, ताप असलेले रुग्ण उघडपणे कुठलीही काळजी न घेता बोहर फिरत असतील तर त्यांच्यावर साथरोग कायद्या नूसार गुन्हे दाखल करावेत अशी सक्त ताकीद केंद्रेकरांनी दिली आहे. खाजगी डाॅक्टरांना नोटीसा देऊन सर्दी, ताप खोकल्याच्या रुग्णांना कोरोना चाचणी करून घेण्याच्या सूचना द्याव्यात असे नमूद करावे, परस्पर व्हायरल लक्षणे सांगून औषधी देऊन घरी पाठवू नये, असे प्रकार लक्षात आल्यास संबंधितांवर कारवाई करावी.
या आहेत महत्वाच्या सूचना
- मंगल कार्यालय, कोचिंग क्लासेसवर धाडी टाकून तपासणी करावी. योग्य प्रकारे निर्जंतुकीकरण व मास्कचा वापर होत नसेल तर आधी नोटीस आणि दुसऱ्यांदा सील करण्याची कारवाई करावी.
- विना मास्क बाहेर फिरणाऱ्यांकडून दंड वसुल करावा, सर्दी, ताप अशी लक्षणे असतांना कुठलीही काळजी न घेता बाहेर फिरणाऱ्यांवर साथ रोग पसरवल्याबद्दल गुन्हे दाखर करावेत.
- भाजीमंडी, फळ बाजार, व्यापारी, दुकानदार, व्यावसायिकांच्या पुन्हा चाचण्या व तपसाण्या सुरू कराव्यात.
- काॅन्टॅक्ट ट्रेसिंग आणि टेस्टींगचे प्रमाण पुर्वीप्रमाणेच वाढवावे. आधीच्या काळात ज्या पद्धतीने एखाद्या घरात कोरोनाची लक्षण असलेला रुग्ण सापडला कि त्याच्या पुर्ण कुटुंबाची तपासणी केली जात होती, तीच पद्धत पुन्हा अवलंबवावी.
- साधरण लक्षणे असली तर होम आयसोलेशन आणि गंभीर लक्षणे असतील तर इन्टीट्युशन्ल आयसोलेशनच करावे.
- जिल्हा परिषदेचे सीईओ, महापालिका आयुक्तांनी तातडीने कोरोना सेंटर, ्व्हेंटिलेटर, तपासणी उपकरणे याचा आढावा घ्यावा.
Edited By : Jagdish Pansare

